
सोलापूर ः राज्याचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांच्या ८१व्या वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशनतर्फे आयोजित करण्यात आलेल्या विजय चषक क्रिकेट स्पर्धेला शानदार प्रारंभ झाला आहे. या स्पर्धेचे उद्घाटन प्रसिद्ध इंदिरा गांधी पार्क स्टेडियमवर दयानंद कॉलेजचे माजी प्राचार्य विजयकुमार उबाळे यांच्या हस्ते आणि जिल्हा संघटनेचे पदाधिकारी यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
जिल्हा क्रिकेट संघटनेचे चेअरमन आमदार रणजितसिंह मोहिते पाटील तसेच संयुक्त सचिव खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रमुख मार्गदर्शनात तसेच अकलूजच्या ग्रीन फ्रिंगर्स स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने ही क्रिकेट स्पर्धा दरवर्षी भरविण्यात येत आहे. जिल्हा संघटनेची अधिकृत स्पर्धा असल्याने जिल्ह्यातील नामवंत क्लब, संघ या स्पर्धेत खेळतात. लेदर बॉल वरील ही स्पर्धा यावर्षी एकदिवसीय सामने या स्वरूपात खेळविण्यात येत आहे.
उद्घाटन प्रसंगी सोलापूर जिल्हा क्रिकेट संघटनेचे माजी सचिव दिलीप बचुवार यांच्यासह संयुक्त सचिव चंद्रकांत रेम्बर्सु, उदय डोके, संजय बडवे, संजय वडजे, सुनील मालप, संजय मोरे, उमेश मामड्याल, एमसीए महिला निवड समिती प्रमुख स्नेहल जाधव, किरण सोनी मनीहार, एमसीए गुणलेखक मिलिंद गोरे, प्रसाद शावंतुल, ऋत्विक चव्हाण, चिराग शहा, दत्ता बडगु आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी जिल्हा क्रिकेट संघटनेच्या वतीने उबाळे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.