राज्य कबड्डी स्पर्धेसाठी मुंबई उपनगरचे चार संघ जाहीर 

  • By admin
  • June 12, 2025
  • 0
  • 18 Views
Spread the love

उद्धव म्हानूर, सेरेना म्हसकर, पवन पांडे, भार्गवी म्हात्रे कर्णधारपदी 

मुंबई ः मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनने पुणे येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज बंदिस्त क्रीडा संकुल येथे होणाऱ्या पहिल्या आदित्य चषक युवा राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेकरिता पूर्व व पश्चिम विभागाचे चारही संघ जाहीर केले. उद्धव म्हानूर, सेरेना म्हसकर, पवन पांडे व भार्गवी म्हात्रे यांची कर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे. 

महाराष्ट्र राज्य व पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने आमदार सचिन अहिर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवशक्ती महिला मंडळातर्फे १४ ते १८ जून या कालावधीत स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. उद्धव म्हानुर, सेरेना म्हसकर यांच्याकडे पूर्व, तर पवन पांडे, भार्गवी म्हात्रे यांच्याकडे पश्चिम विभागाचे नेतृत्व सोपवले आहे. मुंबई उपनगरचे सचिव राजेश पडेलकर यांनी हा संघ प्रसार माध्यमांकरिता जाहीर केला. 

मुंबईचा कबड्डी संघ

पूर्व विभाग मुले : उद्धव म्हानुर (कर्णधार), साई खोपकर, पूर्वेश मेस्त्री, आर्यन भोजने, अमित पिसाळ, रिझवान शेख, नारायण परब, यश मोरे, विवेक पोखरकर, ओमकार पाटील, अनिकेत धारा, ओमकार सोनवणे, चिंतन मोरे, लवकुश यादव.
प्रशिक्षक : हेमंत तोडणकर, व्यवस्थापक : संदेश शिंदे.

पूर्व विभाग मुली : सेरेना म्हसकर (कर्णधार), मुद्रा पाटील, तनुश्री शिंदे, श्वेता शिद्रुक, किरण शिद्रुक, अस्था सिंग, श्रद्धा कांबळे, आर्या देवरकर, प्रांजल जाधव, रिया टकले, प्राजक्ता राजीवडे, सारा येवले, शर्वरी लांबे, भक्ती केंद्रे. प्रशिक्षक : श्रीकांत पिंजारी, व्यवस्थापक : रमेश जावळे.

पश्चिम विभाग मुले : पवन पांडे (कर्णधार), सुरज यादव, समाधान कासार, सनी यादव, तेजस लांबर, निहार जाधव, शिवा बिर्जे, गणेश उकर्डे, कृष्णा कनोजिया, विजयनाथ पाल, वेदांत भुवड, हर्षद शिर्के, मयूर वानखेडे, आयुष पारदुरे. प्रशिक्षक : कमलेश पालव, व्यवस्थापक : सतीश शेट्टी.

पश्चिम विभाग मुली : भार्गवी म्हात्रे (कर्णधार), पूजा चिंदरकर, शलाका मर्ढेकर, तन्वी बरागडे, संस्कृती पाटील, मनस्वी पठारे, ऐश्वर्या बोरा, प्रज्ञा लाड, नियती सावंत, कुमकुम सिंग, रीना थोपटे, साक्षी गावडे, प्रिया कोळी, झाशी वाघमोडे. प्रशिक्षक : अमित ताम्हाणेकर, व्यवस्थापक : योगेश रेवाळे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *