
दबंग दिल्ली संघाची अपराजित मालिका संपुष्टात
अहमदाबाद ः यू मुंबा टीटी संघाने इंडियनऑइल अल्टीमेट टेबल टेनिस (यूटीटी) सीझन ६ मध्ये दबंग दिल्ली टीटीसीवर १०-५ असा विजय मिळवून उपांत्य फेरीसाठीचे चौथे आणि स्थान निश्चित केले. या पराभवामुळे दिल्लीचा सलग चार सामन्यांतील विजयी मालिका संपुष्टात आली. पण, सीझन २ चे विजेते ४४ गुणांसह लीग टेबल मध्ये अव्वल स्थानावर राहिले.
अहमदाबाद विमान अपघातातील बळींना श्रद्धांजली वाहण्यासाठी दोन्ही संघांनी हातावर काळ्या पट्ट्या बांधल्या आणि सुरुवातीपूर्वी एक मिनिट शांतता पाळली. लिलियन बार्डेटने यू मुंबा टी टी संघाला सुरुवातीच्या एकेरी सामन्यात साथियान ज्ञानशेखरनचा २-१ असा पराभव करून उत्तम सुरुवात करून दिली. पहिला गेम ११-१० असा अटीतटीचा जिंकल्यानंतर, बार्डेटने दुसरा गेम ४-११ असा गमावला, निर्णायक सामन्यात त्याने ११-४ असा जोरदार विजय मिळवला. त्यानंतर बर्नाडेट स्झोक्सने दिया चितळेवर २-१ असा विजय मिळवला. चितळेने पहिला गेम ११-३ असा जिंकला, परंतु स्झोक्सने ११-१० असा गोल्डन पॉइंट विजय मिळवून बरोबरी साधली आणि सामना ११-८ असा संपुष्टात आणला.
मिश्र दुहेरीतही हीच गती कायम राहिली, जिथे स्झोक्सने आकाश पालसोबत भागीदारी करून पहिल्या गेममध्ये इझाक क्वेक आणि दिया चितळे यांना हरवले. या विजयासह यू मुंबाचे उपांत्य फेरीतील स्थान निश्चित केले. तथापि, दिल्लीने पुनरागमन केले, उर्वरित दोन गेम जिंकले.
अभिनंद पीबीने सिंगापूरच्या इझाक क्वेकवर २-१ असा विजय मिळवत यू मुंबासाठी आणखी दोन गुणांची भर घातली. अभिनंदने हंगामातील पहिल्याच सामन्यात दमदार सुरुवात केली आणि पहिले दोन गेम जिंकले, त्यानंतर इझाकने एक गेम ११-७ असा जिंकून दबंग दिल्लीला गुणतालिकेत अव्वल स्थानावर नेले. अंतिम सामन्यात, यशस्विनी घोरपडेने तिची वर्ल्ड युथ चॅम्पियनशिप २०२३ ची सहकारी सुहाना सैनी हिला ३-० असे हरवले, गोल्डन पॉइंटवर दोन कठीण गेम जिंकले आणि नंतर सामना ११-३ असा संपला.
स्झोक्सने परदेशी खेळाडू आणि शॉट ऑफ द टाय हे दुहेरी मान मिळवला, तर यशस्विनीला भारतीय खेळाडू ऑफ द टाय म्हणून गौरवण्यात आले. दबंग दिल्ली आता पहिल्या उपांत्य फेरीत जयपूर पॅट्रियट्स संघाशी लढेल, तर विद्यमान विजेता डेम्पो गोवा चॅलेंजर्स दुसऱ्या उपांत्य फेरीत यू मुंबा टीटी संघाशी लढेल. संबंधित सामन्यांमधील विजेते १५ जून रोजी ग्रँड फिनालेमध्ये सहभागी होतील.