रायगडच्या चौघांचे राज्यस्तरीय पंच परीक्षेत यश

  • By admin
  • June 13, 2025
  • 0
  • 94 Views
Spread the love

रायगड ः रायगड जिल्हा थाई बॉक्सिंग असोसिएशनच्या चौघांची राज्यस्तरीय थाई बॉक्सिंग पंच परीक्षेत निवड झाली होती.

या पंच परीक्षेसाठी थाई बॉक्सिंग इंडिया फेडरेशनचे अध्यक्ष पाशा अत्तार यांनी पंच परीक्षेसाठी उपस्थित असलेल्या नवीन ऑफिसिअल पंचांना प्रशिक्षण दिले व संपूर्ण थाई बॉक्सिंगच्या नियमावलीचे वाचन करून गुण रेखा आणि इशाऱ्यांचे योग्य मार्गदर्शन केले. त्यानंतर गुणतक्ता समजावून लेखी परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेसाठी मुंबई विभाग अध्यक्ष हरी ओम सर, उपाध्यक्ष अजय सरोदे तसेच महाराष्ट्र महिला सुरक्षा कमिटीच्या अध्यक्षा अरुणा हिवरकर आणि रायगड जिल्हा अध्यक्ष स्वप्निल अडूरकर आदी मान्यवर उपस्थित होते.

परीक्षेसाठी मोहिनी आडुरकर, सौरभ गुरव, दिशांत भोईर, वैदेही जाधव व मुंबई विभागातील मुलांचाही सहभाग होता. दिशांत भोईर व वैदेही जाधव या दोघांनी ए ग्रेड मध्ये उत्तीर्ण होऊन राज्यस्तरीय पंच होण्याचा सन्मान मिळविला. ही दोन्ही मुले माथेरान व्हॅली स्कूलचे विद्यार्धी असून याच शाळेच्या ग्राऊंडवर सराव करत असतात.

दिशांत हा राष्ट्रीय रिंग ऑफ किंग बेल्ट वीनर असून वैदेही ही आंतरराष्ट्रीय मेडलिस्ट आहे. या दोघांनी सुवर्ण हस्ताक्षरात आपले नाव कोरुन आई-वडिलांचे नाव उज्ज्वल केले. या यशस्वी कामगिरीसाठी शाळेचे प्रशिक्षक स्वप्निल अडूरकर आणि करण बाबरे यांचे मोलाचे सहकार्य लाभले आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका मृदुला पटेल व शिक्षिका शिक्षक वृंद आदींनी शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *