
राज्य टेनिस क्रिकेट स्पर्धा
रायगड ः नाशिक येथे झालेल्या आठव्या राज्यस्तरीय सीनियर टेनिस क्रिकेट स्पर्धेत माथेरान व्हॅली स्कूलच्या मुलींच्या संघाने उपविजेतेपद पटकावले.
अंतिम सामना हा रायगड आणि सांगली या दोन संघामध्ये झाला. यात माथेरान व्हॅली स्कूल संघाने उपविजेतेपद संपादन केले. नव्या उमेदीने पुन्हा लढा देऊ असे कर्णधार आर्या माळीने सांगितले. या सामन्यामध्ये उपकर्णधार जुई वासावे आणि वेदिका पेरणे या दोघींनी नाबाद ५६ धावा मारून उत्कृष्ट प्रदर्शन केले होते.
इंडिया फेडरेशन व महाराष्ट्रच्या सेक्रेटरी मीनाक्षी गिरी, विलास गायकवाड आदींनी कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. शाळेच्या समन्वयक शोभना मॅडम, प्राचार्य मृदुला पटेल व शिक्षक वृंद या सर्वांनी शुभेच्छा दिल्या. तसेच भारत एज्युकेशन सोसायटीचे प्रेसिडेंट गोपा कुमार नाय्यर, व्हॉईस प्रेसिडेंट कार्तिका मॅडम, सीईओ शीला मॅडम, कोषाध्यक्ष रामचंद्रन, सेक्रेटरी विवेक पिल्ले, कॉर्डिनेटर शोभना मॅडम, प्रिन्सिपल मृदुला पटेल, सुप्रिडेंट महेश लाड, सुपरवायझर राजश्री चव्हाण आणि मीना आंबोरे, क्रीडा विभाग प्रमुख सूर्यवंशी, मौर्या आणि शिक्षिका व शिक्षक वृंद यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत. शारीरिक शिक्षण प्रशिक्षक स्वप्निल अडुरकर व करण बाबरे यांचे खेळाडूंना मोलाचे प्रशिक्षण लाभले.