न्यूझीलंड संघाविरुद्धच्या मालिकेसाठी आठ शहरांची निवड 

  • By admin
  • June 13, 2025
  • 0
  • 19 Views
Spread the love

भारतीय क्रिकेट संघाचा भरगच्च कार्यक्रम 

नवी दिल्ली ः न्यूझीलंड संघाच्या भारत दौऱ्यासाठी ८ शहरांची निवड करण्यात आली आहे. हे सामने टी २० विश्वचषकापूर्वी होणार आहेत. 

२०२५ वर्षाचा अर्धा भाग संपला आहे आणि उर्वरित अर्ध्या वर्षाचे वेळापत्रकही भारतीय संघासाठी पूर्ण भरलेले आहे. २० जूनपासून इंग्लंड दौऱ्यावर ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळण्यासाठी भारतीय संघ सज्ज आहे. त्यानंतर भारतीय संघ वेस्ट इंडिजसोबत मायदेशात २ सामन्यांची कसोटी मालिका खेळेल. त्यानंतर, भारतीय संघ ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियाचा दौरा करेल. या दौऱयात दोन्ही संघांमध्ये ३ एकदिवसीय आणि ५ टी २० सामने खेळले जातील. त्यानंतर, दक्षिण आफ्रिकेचा संघ नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये भारतात येईल आणि तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळेल. म्हणजेच भारतीय संघ डिसेंबरपर्यंत खूप व्यस्त राहणार आहे.

भारत विरुद्ध न्यूझीलंड मालिकेसाठी ८ शहरांची निवड
भारतीय संघ नवीन वर्षाची सुरुवात म्हणजेच २०२६ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध करेल. न्यूझीलंडचा संघ एकदिवसीय आणि टी २० मालिका खेळण्यासाठी भारतात येईल. या दोन्ही मालिकांसाठी ८ शहरांची निवड करण्यात आली आहे, ज्यामध्ये जयपूर, मोहाली, इंदूर, राजकोट, गुवाहाटी, हैदराबाद, त्रिवेंद्रम आणि नागपूर यांचा समावेश आहे. एकदिवसीय मालिकेत एकूण ३ सामने खेळवले जातील तर टी-२० मालिकेत ५ सामने खेळवले जातील. अशा परिस्थितीत, ८ सामन्यांसाठी ८ शहरांची निवड करण्यात आली आहे. पुढील वर्षीच्या सुरुवातीला होणाऱ्या या दोन्ही मालिकांसाठी काही इतर ठिकाणांचाही विचार केला जात आहे.

भारतीय संघ आणि न्यूझीलंडमधील एकदिवसीय आणि टी २० मालिकेनंतर, भारत आणि श्रीलंकेच्या संयुक्त यजमानपदाखाली फेब्रुवारी-मार्चमध्ये टी २० विश्वचषक आयोजित केला जाईल. भारतीय संघ टी २० विश्वचषकाचा गतविजेता आहे. या आयसीसी स्पर्धेनंतर लगेचच आयपीएल २०२६ खेळवण्यात येईल.

२०२५ मध्ये भारतीय संघाचे वेळापत्रक

जून-ऑगस्ट  : इंग्लंड विरुद्ध – ५ कसोटी 
ऑक्टोबर : वेस्ट इंडिज विरुद्ध  २ कसोटी
ऑक्टोबर-नोव्हेंबर : ऑस्ट्रेलिया विरुद्ध  ३ एकदिवसीय, ५ टी २० सामने नोव्हेंबर-डिसेंबर : दक्षिण आफ्रिका विरुद्ध  २ कसोटी (WTC २०२५-२७), ३ एकदिवसीय, ५ टी २० सामने 

२०२६ मध्ये भारतीय संघाचे वेळापत्रक

जानेवारी : न्यूझीलंड विरुद्ध ३ एकदिवसीय, ५ टी २० सामने
फेब्रुवारी-मार्च : टी २० विश्वचषक २०२६ (भारत/श्रीलंका)
जून : अफगाणिस्तान विरुद्ध १ कसोटी, ३ एकदिवसीय
जुलै : इंग्लंड विरुद्ध ३ एकदिवसीय सामने, ५ टी २० सामने 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *