
चिली येथे आयोजन, २४ संघांचा सहभाग
नवी दिल्ली ः महिला ज्युनियर हॉकी विश्वचषक स्पर्धा यावर्षी चिली येथे होणार आहे. यावेळी एकूण २४ संघ या स्पर्धेत सहभागी होतील. या संघांना प्रत्येकी चार संघांच्या पूलमध्ये विभागण्यात आले आहे. हा विश्वचषक दर दोन वर्षांनी आयोजित केला जातो. आता आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाने कोणता संघ कोणत्या पूलमध्ये असेल हे सांगितले आहे. भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाला पूल-क मध्ये स्थान देण्यात आले आहे. भारताने ही प्रतिष्ठित स्पर्धा कधीही जिंकलेली नाही.
संघांची संख्या वाढली
महिला ज्युनियर हॉकी विश्वचषक शेवटचा २०२३ मध्ये सॅंटियागो येथे आयोजित करण्यात आला होता ज्यामध्ये १६ संघांनी भाग घेतला होता. यावेळी संघांची संख्या वाढली आहे. पहिल्यांदाच २४ संघ सहभागी होतील. यावेळी चाहत्यांना अधिक सामने पाहायला मिळतील आणि त्यांचा उत्साहही दुप्पट होण्याची अपेक्षा आहे. यावेळी ही स्पर्धा १ डिसेंबर ते १३ डिसेंबर दरम्यान खेळवली जाईल.
भारतीय महिला हॉकी संघाला पूल-क मध्ये स्थान
महिला ज्युनियर हॉकी विश्वचषकासाठी पूल-क मध्ये भारताला स्थान मिळाले आहे. भारताव्यतिरिक्त या पूलमध्ये जर्मनी, आयर्लंड आणि नामिबियाचा समावेश आहे. जर्मनीतील मोंचेनग्लॅडबाख येथे खेळवण्यात आलेल्या स्पर्धेत भारत तिसऱ्या आणि दक्षिण आफ्रिकेतील पॉचेफस्ट्रूम येथे खेळवण्यात आलेल्या स्पर्धेत चौथ्या स्थानावर राहिला. गोलकीपर निधीच्या नेतृत्वाखालील संघाने नुकत्याच अर्जेंटिनामध्ये संपलेल्या चार देशांच्या स्पर्धेत चार सामने जिंकले आणि दोन पराभव पत्करले. भारतीय संघाने उरुग्वे संघाला दोनदा पराभूत केले आणि चिली आणि अर्जेंटिनाविरुद्ध प्रत्येकी एक सामना जिंकला.
नेदरलँड्स संघाचा पूल-क मध्ये समावेश
पाच वेळा विजेत्या नेदरलँड्सला पूल-क मध्ये स्थान मिळाले आहे. त्याशिवाय जपान, चिली, मलेशिया या पूलमध्ये समाविष्ट आहेत. दोन वेळा विजेता अर्जेंटिना पूल-क मध्ये स्थान मिळाले आहे.
ज्युनियर महिला हॉकी विश्वचषक स्पर्धेची गटवारी
पूल अ : नेदरलँड्स, जपान, चिली, मलेशिया
पूल ब : अर्जेंटिना, बेल्जियम, झिम्बाब्वे, वेल्स
पूल क : जर्मनी, भारत, आयर्लंड, नामिबिया
पूल ड : इंग्लंड, दक्षिण आफ्रिका, चीन, ऑस्ट्रिया
पूल इ : ऑस्ट्रेलिया, स्पेन, कॅनडा, स्कॉटलंड
पूल फ : अमेरिका, कोरिया, न्यूझीलंड, उरुग्वे