पुणे ः चंद्रपूर येथे २२ ते २४ जून दरम्यान होणाऱ्या वरिष्ठ महिला महाराष्ट्र राज्य बॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेसाठी पुणे शहर बॉक्सिंग संघाची निवड चाचणी मंगळवारी (१७ जून) जनरल अरुण कुमार वैद्य स्टेडियम भवानी पेठ पुणे येथे घेण्यात येणार आहे.
वैद्यकीय चाचणी व वजने सायंकाळी ४ ते ५ यावेळेत होईल. सदरची चाचणी भाग्यपत्रिके नुसार ६ वाजता निवड चाचणी प्रक्रियाला सुरुवात होणार आहे. याची प्रत्येक पुणे शहरातील क्लब व प्रशिक्षक खेळाडूंनी याची नोंद घ्यावी.
वरिष्ठ महिला वजन गट
४५ ते ४८ किलो, ४८ ते ५१ किलो, ५१ ते ५४ किलो, ५४ ते ५७ किलो, ५७ ते ६० किलो ,६० ते ६५ किलो, ६५ ते ७० किलो, ७० ते ७५ किलो, ७५ ते ८० किलो, + ८० किलो अशा १० वजन गटांमध्ये निवड चाचणी होणार आहे.
कोणतेही खेळाडू निवड चाचणी मध्ये सहभागी न होता, राज्य अजिंक्यपद स्पर्धेच्या ठिकाणी येऊन सहभागी होण्यासाठी प्रयत्न केला तर पुणे शहर बॉक्सिंग संघटना याबाबत कोणतीही जबाबदारी घेणार नाही, तसेच संघटनेच्या घटने प्रमाणे त्यांच्यावर कायदेशीर कार्यवाही देखील केली जाईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी.
अधिक माहितीसाठी पुणे शहर संघटनेचे सचिव विजय गुजर (९३२६१५३२४३) यांच्याशी संपर्क करावा, असे आवाहन पुणे शहर बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष अविनाश बागवे यांनी केले आहे.