
छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर जिल्हा अमॅच्युअर बुद्धिबळ निवड चाचणी (रेटिंग २००० खालील) स्पर्धेचे आयोजन टेक्नोकीड, वेंकटेश नगर येथे रविवारी (१५ जून) करण्यात आले आहे.
एलो रेटिंग २००० खालील या निवड चाचणी स्पर्धेद्वारे पहिल्या दोन गुणवंत खेळाडूंची निवड राज्य अमॅच्युअर बुद्धिबळ अजिंक्यपद स्पर्धेत करण्यात येईल. तसेच या निवड चाचणी स्पर्धेनंतर लगेच ब्लिट्झ् बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
खुला गट व वयोगटातील विजेते यांना मेडल्स व आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. संघात निवड झालेल्या खेळाडूस जिल्हा संघटनेच्यावतीने राज्य अजिंक्यपद स्पर्धेची प्रवेश फी राज्य स्पर्धेच्या पूर्ण सहभाग नंतर प्रदान करण्यात येईल.
या दोन्ही स्पर्धेचे नाव नोंदणी १४ जूनपर्यंत करणे आवश्यक आहे. स्पर्धकांनी स्पर्धा स्थळी रविवारी सकाळी ११ वाजता उपस्थित राहावे व अधिक माहितीसाठी जिल्हा सचिव हेमेंद्र पटेल (९३२५२२८२६१) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.