सोलापूर ः सोलापूर शहर व जिल्हा बेसबॉल असोसिएशन यांच्या वतीने बेसबॉल पुरुष व महिला जिल्हा निवड चाचणी स्पर्धा शनिवारी (१४ जून) श्री मल्लिकार्जुन हायस्कूल हत्तुरे नगर विमानतळ समोर येथे सकाळी १० वाजता होणार आहे.
या निवड चाचणीसाठी येताना खेळाडूंनी आधार कार्डची झेरॉक्स व आवश्यक साहित्यांसह मैदानावर उपस्थित रहावे. यामधून निवडलेला संघ हा २० ते २२ जून या कालावधीत अमरावती येथे होणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत सहभागी होईल
खेळाडूंनी मैदानावर संघटनेचे जिल्हा सचिव संतोष खेंडे (9850666795) व गंगाराम घोडके (9423717277) यांच्याशी संपर्क साधावा. या निवड चाचणी स्पर्धेसाठी जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा संघटनेचे जिल्हाध्यक्ष सीए विनोद भोसले, उपाध्यक्ष संतोष गवळी व सचिव संतोष खेंडे यांनी केले आहे.