नांदेड ः हौशी बेसबॉल असोसिएशन नांदेडच्या वतीने नांदेड सीनियर महिला व पुरुष बेसबॉल राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड चाचणी १५ जून रोजी दुपारी ३.३० वाजता मंजुळा नगर मैदान भोकर (नांदेड) येथे होणार आहे.
या निवड चाचणी स्पर्धेसाठी खेळाडूंनी सोबत येताना वयाचा पुरावा आधार कार्ड, दोन फोटो व आवश्यक साहित्य सोबत आणावे. खेळाडूंनी मैदानावर आनंदा कांबळे व बालाजी गाडेकर यांच्याशी संपर्क साधावा. यामधून निवडलेल्या संघ २० ते २२ जून रोजी संत गाडगे महाराज युनिव्हर्सिटी अमरावती येथे होणाऱ्या १८व्या महाराष्ट्र राज्यस्तरीय बेसबॉल क्रीडा स्पर्धेसाठी निवडला जाणार आहे.
या निवड चाचणीसाठी जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग नोंदवावा असे आवाहन हौशी बेसबॉल असोसिएशन नांदेडचे जिल्हा अध्यक्ष प्रशांत अण्णा तिकडे पाटील, उपाध्यक्ष नारसिंग अण्णा आठवले, हौशी बेसबॉल असोसिएशन नांदेडचे सचिव आनंदा कांबळे, भोकर येथील मुख्य बेसबॉल क्रीडा प्रशिक्षक बालाजी गाडेकर यांनी या निवड चाचणीमध्ये सहभाग होण्याकरिता आवाहन केले आहे. अधिक माहितीसाठी सचिव आनंदा कांबळे (7447677632, 8329157440), बालाजी गाडेकर (9921855097) यांच्याशी संपर्क साधावा.