विंचूरच्या श्री पंचाक्षरी प्रशाला संघास विजेतेपद

  • By admin
  • June 15, 2025
  • 0
  • 10 Views
Spread the love

विंचूर प्रीमियर लीग खो-खो स्पर्धा

सोलापूर ः विंचूरच्या श्री पंचाक्षरी प्रशाला संघाने विंचूर प्रीमियर लीग खो-खो स्पर्धेचे विजेतेपद पटकाविले.

विंचूरच्या पंचाक्षरी विद्या मंदिर शाळेच्या मैदानावर झालेल्या या स्पर्धेतील अंतिम सामन्यात पंचाक्षरी प्रशाला संघाने चुरशीच्या लढतीत विंचूर खो-खो क्लबचा एक गुणांनी पराभव केला. निर्धारित वेळेतील सामन्यात मध्यंतरास २-२ आणि नंतर ४-४ अशी बरोबरी झाल्यानंतर ज्यादा वेळेतील डावात पंचाक्षरी प्रशाला संघाने बाजी मारली. त्यात समर्थ सोनगी याने अष्टपैलू, निलोफर शेख हिने संरक्षक तर विशाल पवार याने आक्रमकाची पारितोषिक पटकाविले.

विंचूर व अंत्रोळी येथील पहिली ते सातवीच्या विद्यार्थी व विद्यार्थिनींचे एक महिन्याचे प्रशिक्षण शिबिर घेऊन त्यांच्यातूनच या दोन संघाबरोबरच ग्रामपंचायत विंचूर व जिल्हा परिषद शाळा असे चार संघ तयार करून ही स्पर्धा सोलापूर ॲम्युचर खो-खो असोसिएशनचे  सदस्य व विंचूरचे क्रीडा शिक्षक तुळशीराम शेतसंदी यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती. प्रशिक्षण शिबिरास व स्पर्धेस गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद होता. त्यांनी प्रशिक्षण शिबिरासाठी आर्थिक सहाय्य आणि अंतिम सामन्यानंतर बक्षिसाचा वर्षाव केला. विजयी व उपविजयी संघांना सुमारे दहा हजार रुपयेची पारितोषिके व करंडक देण्यात दिले. ही पारितोषिके बाळासाहेब पाटील, विजयकुमार बिराजदार, नागेश बिराजदार, भीमाशंकर सोनगी,  अमोल साबळे, संजय जाधव, आदित्य झाडबुके, मल्लिकार्जुन झाडबुके यांनी पुरस्कृत केली होती.

ही पारितोषिके माजी गटशिक्षणाधिकारी मल्हारी बनसोडे, शिक्षण विस्तार अधिकारी गुरुबाळा सनके, मागास समाज सेवा मंडळाचे संचालक नागेश बिराजदार, सोलापूर ॲम्युचर खोखो असोसिएशनचे सरचिटणीस अजितकुमार संगवे, पोलीस पाटील मल्लिकार्जुन झाडबुके, मुख्याध्यापक अशोक लिगाडे, बाळासाहेब पाटील, विंचूरचे माजी खेळाडू महावीर नळे यांच्या प्रमुख उपस्थितीत देण्यात आली. यावेळी चारही संघाचे प्रशिक्षक बालाजी चव्हाण, विक्रम जाधव, विकास पवार व विकास कोळी तसेच पंच अविनाश कोळी व संजय जाधव यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन अशोक कोळी यांनी केले. नागनाथ फुलारी यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *