
सायकलिंग ही केवळ प्रवासाची पद्धत नसून, आरोग्य, पर्यावरण आणि समुदायाच्या एकात्मतेचे प्रतीक आहे. आरोग्यमय जीवन जगण्यासाठी सायकलिंग हे खूप महत्त्वाचे आहे. पुरुषांबरोबर महिलांंचा उत्साह नियमित सायकलिंगमुळे वाढलेला आहे. परंतु सायकलिंग करत असताना सकाळी रॉंगसाईडने येणारे वाहने खूप त्रासदायक ठरत आहेत. त्यामुळे एक्सिडेंट होण्याची दाट शक्यता असते. जाधव मंडी, बस स्टँड मार्ग, सिद्धार्थ गार्डन, बाबा पेट्रोल पंप या रूट वर रॉंगसाईड वाहनांची वर्दळ जास्त प्रमाणात असते. या ठिकाणी कडक कारवाई झाली पाहिजे. त्याचबरोबर या सर्व अडचणी दूर करण्यासाठी एक मात्र उपाय आहे की सायकलिंग ट्रॅक जर लवकरात लवकर तयार करण्यात आला तर अतिउत्तम. सायकलिंग ट्रॅक झाल्यानंतर सायकलिंग करणाऱ्यांची सर्व वयोगटातील मुली-मुले, महिला-पुरुष यांना सायकलिंग करण्यास अडचण येणार नाही.
- नीता पंढरीनाथ गंगावणे, अध्यक्ष, तेजस्विनी सायकलिंग क्लब छत्रपती संभाजीनगर