
सांगली ः वुशू असोसिएशन ऑफ इंडियाच्या मान्यतेने तामिळनाडू वुशू असोसिएशन आयोजित २५व्या राष्ट्रीय सब ज्युनियर वुशू अजिंक्यपद स्पर्धेत श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिक पॅटर्न निवासी शाळेचे तीन विद्यार्थी अभिजीत अजय म्हेत्रे, देवराज सागर कोळेकर, श्रेयश आनंदा खोत यांनी चमकदार कामगिरी नोंदवली.
के एस आर इंजिनिअरिंग कॉलेज येथे ही स्पर्धा यशस्वीरित्या झाली. या राष्ट्रीय वुशू स्पर्धेत श्री चिदंबर गुरुकुल स्पोर्ट्स अकॅडमी सैनिक पॅटर्न निवासी शाळेचे तीन विद्यार्थी अभिजीत अजय म्हेत्रे, देवराज सागर कोळेकर, श्रेयश आनंदा खोत यांनी आपआपल्या वजन गटांमध्ये आपल्या कारकिर्दीच्या पहिल्याच राष्ट्रीय वुशू स्पर्धेत सहभाग घेऊन उत्कृष्ट कामगिरी बजावली. तसेच महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करताना आपल्यापेक्षा अनुभवी व सरस प्रतिस्पर्धी खेळाडूंशी अत्यंत चुरशीने लढत देऊन आपली कामगिरी यशस्वीरित्या नोंदवली.
या सर्व यशस्वी खेळाडूंना श्री चिदंबरदास गुरु गोविंद महाराज यांचे आशीर्वाद लाभले असून त्यांना मुख्य प्रशिक्षक जिल्हा क्रीडा पुरस्कार विजेते आप्पासाहेब तांबे, सांगली जिल्हा वुशू संघटनेचे अध्यक्ष सम्राट महाडिक, सचिव सुरेश चौधरी यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.