< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); धुळे येथे राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा – Sport Splus

धुळे येथे राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा

  • By admin
  • June 16, 2025
  • 0
  • 68 Views
Spread the love

सरचिटणीस डॉ. चंद्रजीत जाधव यांची माहिती

पुणे ः वरिष्ठ गट (खुला गट) पुरुष व महिलांची राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा धुळ्यात होणार असल्याची माहिती महाराष्ट्र खो-खो संघटनेचे सरचिटणीस डॉ चंद्रजित जाधव यांनी दिली.

पुणे येथील नेहरू स्टेडियमवरील महाराष्ट्र खो-खो असोसिएशनच्या कार्यालयात झालेल्या शासकीय परिषदेच्या बैठकीत यंदाच्या मोसमातील राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धांची ठिकाणे निश्चित करण्यात आली. संघटनेचे अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी संघटनेचे चेअरमन सचिन गोडबोले, खजिनदार गोविंद शर्मा, माजी सरचिटणीस प्रा जनार्दन शेळके, सहसचिव जयांशु पोळ, डॉ राजेश सोनवणे, डॉ पवन पाटील व बाळ तोरसकर आदी उपस्थित होते.

या बैठकीत किशोर गट स्पर्धा परभणीत तर कुमार गट बीड किंवा अहिल्यानगरमध्ये घेण्यात येणार असल्याचे निश्चित करण्यात आले. राज्यातील पंचांचे प्रशिक्षण शिबिरही जुलै अखेर धुळ्यात होणार असल्याचे डॉ जाधव यांनी सांगितले. तसेच राज्य खो-खो पंच परीक्षा रविवार २९ जून रोजी घेण्यात येणार आहे. संलग्न जिल्हा संघटनानी आपली नोंदणी २० जूनपर्यंत सायंकाळी पाच वाजेपर्यंत maharashtrakhokhoassociation@gmail.com या मेलवर करावी.

या बैठकीत निवड समिती सदस्य, प्रशिक्षक व सहाय्यक प्रशिक्षक यांच्याही नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. त्या नियुक्त्या याप्रमाणे आहेत.

निवड समिती, प्रशिक्षक व सहाय्यक प्रशिक्षक असे – निवड समिती :

पुरुष – महिला : सुरेंद्र विश्वकर्मा (मुंबई)राम चोखट (परभणी), कृष्णा करंजळकर (रत्नागिरी), प्रियांका चव्हाण (ठाणे).

कुमार गट – मुली : श्रीनिवास मेतरी (रायगड), मनोज परदेशी (नंदुरबार), योगेश सोलसे (बीड), राखी जोशी (पुणे).

किशोर – किशोरी : भाऊसाहेब पवार (अहिल्यानगर), नरेंद्र रायलवार (हिंगोली), पंढरीनाथ बडगुजर (धुळे), छाया लांडगे ( छत्रपती संभाजीनगर).

प्रशिक्षक व सहाय्यक प्रशिक्षक : नरेंद्र कुंदर (मुंबई उपनगर), अजित शिंदे (सोलापूर), नरेंद्र मेंगळ (ठाणे ), निकिता पवार (धाराशिव), मोहन रजपूत (सोलापूर), सुजित माळी (लातूर), अभिजीत पाटील (धाराशिव), ऐश्वर्या सावंत (रत्नागिरी), विकास सूर्यवंशी (छत्रपती संभाजीनगर), धीरज दंडवते (पुणे), अतुल जाधव (सोलापूर), सुरज शिंदे (हिंगोली).

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *