जळगाव येथे मल्लखांब स्पर्धेने जागतिक मल्लखांब दिन साजरा

  • By admin
  • June 16, 2025
  • 0
  • 84 Views
Spread the love

जळगाव ः जळगाव जिल्हा हौशी मल्लखांब असोसिएशन व एकलव्य क्रीडा संकुल यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक मल्लखांब दिनानिमित्त जिल्हास्तरीय मल्लखांब स्पर्धेचे आयोजन करून साजरा करण्यात आला.

एकलव्य क्रीडा संकुलात झालेल्या या स्पर्धेत जिल्हाभरातून खेळाडू सहभागी झाले होते. स्पर्धेचे उद्घाटन मल्लखांबचे जनक बाळंभट्टदादा देवधर व शक्तीची देवता बजरंग बली यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण तसेच मल्लखांब व साहित्याचे पूजन करून करण्यात आले. स्पर्धेचे पारितोषिक वितरण जिल्हा धर्मादाय आयुक्त मोहन गाढे, आरटीओ सब इन्स्पेक्टर पुरुषोत्तम शेवाळे, जळगाव जिल्हा मल्लखांब असोसिएशनचे अध्यक्ष राजेश जाधव, आरटीओ सब इन्स्पेक्टर स्वप्निल दाभाडे, ॲड निशांत अत्रे, जळगाव जिल्हा डॉजबॉल असोसिएशनचे सचिव योगेश सोनवणे, उद्योजक निलेश अजनाडकर व प्रसाद खंडेलवाल यांच्या हस्ते प्रत्येक गटातील प्रथम तीन खेळाडूंना पदके देऊन गौरविण्यात आले.

या प्रसंगी खेळाडू व पालक यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा मल्लखांब असोसिएशनचे सहसचिव नरेंद्र भोई यांनी केले. या स्पर्धेत पंच म्हणून नरेंद्र भोई, धनराज भोई, ईशा पिंप्रीकर, तुषार जोहरे, ईशिका लखवानी, आशुतोष भोई, चारुशीला भोई व सागर चौधरी यांनी काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *