भारतीय योग संस्थानतर्फे २१ जून रोजी योग दिनाचे आयोजन

  • By admin
  • June 16, 2025
  • 0
  • 180 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर ः भारतीय योग संस्थान (दिल्ली) शाखा छत्रपती संभाजीनगर आयोजित ११वा आंतरराष्ट्रीय योग दिवस २१ जून रोजी साजरा करण्यात येणार आहे.
सिडको एन ८ मधील बॉटॅनिकल गार्डन या ठिकाणी २१ जून रोजी सकाळी ५.४५ ते ७ वाजेपर्यंत योग दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या प्रसंगी राज्याचे उप प्रांत प्रधान डॉ उत्तम काळवणे, विभागीय प्रधान संजय औरंगाबादकर, विभागीय मंत्री आनंद अग्रवाल, वर्षा देशपांडे, सुरेश शेळके यांची मार्गदर्शक म्हणून उपस्थिती राहाणार आहे.

या कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा प्रधान कैलास जाधव, न भाऊ सुरडकर, वैजनाथ डोमाळे, विद्या ताकसांडे, भास्कर चाटे, दिनेश देशपांडे, सुरेश डहाके, शंकर जाधव, राधा पारेख, जिल्हा मंत्री सुधाकर ढवळे, संघटन मंत्री शिवाजी गायकवाड, क्षेत्र प्रधान अजीत कुलकर्णी, आशा जाधव, सुदाम पळसकर, वासंती कुलकर्णी यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *