राज्य स्क्वॉश स्पर्धेत पुणे, छत्रपती संभाजीनगर, परभणी, नांदेड, अमरावती खेळाडूंचा दबदबा

  • By admin
  • June 17, 2025
  • 0
  • 75 Views
Spread the love

महाराष्ट्र स्क्वॉश अकादमी येथे स्पर्धेचे उत्कृष्ट आयोजन

पुणे ः महाराष्ट्र राज्य स्क्वॉश रॅकेट संघटनेतर्फे आयोजित करण्यात आलेल्या आंतर जिल्हा अजिंक्यपद स्क्वॉश रॅकेट स्पर्धेत छत्रपती संभाजीनगर, पुणे, परभणी, नांदेड, अमरावती संघाच्या खेळाडूंनी वर्चस्व गाजवत घवघवीत यश संपादन केले. 

उंड्री येथे महाराष्ट्र स्क्वॉश अकादमी या ठिकाणी राज्यस्तरीय आंतर जिल्हा स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धा रंगतदार झाली. या स्पर्धेचे उद्घाटन पुण्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सहसचिव डॉ. दयानंद कुमार, महाराष्ट्र राज्य स्क्वॉश रॅकेट संघटनेचे अध्यक्ष डॉ. प्रदीप खांड्रे, पुणे जिल्हा सचिव आनंद लाहोटी, नकुल चव्हाण, चेतन आमीन, शिवाजी चंद्रकोळी आदी मान्यवर उपस्थित होते. 

ज्युनियर गटाच्या पारितोषिक वितरण समारंभास प्रमुख अतिथी म्हणून वरिष्ठ पोलिस निरीक्षक मानसिंग पाटील, राजेंद्र भिंताडे, राज्य अध्यक्ष डॉ. प्रदीप खांड्रे, नकुल चव्हाण, पुणे जिल्हा सचिव आनंद लाहोटी, शिवाजी चंद्रकोळी यांची प्रमुख उपस्थिती होती. 

वरिष्ठ गटाच्या पारितोषिक वितरण कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून अवर सचिव अशोक दम्यावार, राज्य अध्यक्ष डॉ. प्रदीप खांड्रे, नकुल चव्हाण, सरणजीत सिंग बग्गा, पुणे जिल्हा सचिव आनंद लाहोटी, शिवाजी चंद्रकोळी, रणजीत भारद्वाज, सतीश पोतदार, बाबुराव खंदारे, गणेश तांबे, पवन राऊत, रोहिदास गाडेकर आदी उपस्थित होते. या स्पर्धेसाठी आमदार विजय बापू शिवतारे यांनी आमदार निधी देऊन खेळाडूंना उत्तम सुविधा उपलब्ध करून दिल्या. त्याबद्दल संघटनेतर्फे त्यांचे आभार व्यक्त करण्यात आले.

या स्पर्धेत अरवा शेलार, तन्वी कडू, ह्रिधान गाडेकर, सिद्धांत शर्मा, बुरहान भानपूरवाला, जिज्ञासा मुराडे, आस्था आनंद लाहोटी, अलाय अग्रवाल, अवदेश यादव, कहू पारेख, आदित्य घोडके, अस्मिरा बेग यांनी आपापल्या गटात विजेतेपद पटकावले. 

स्पर्धेचा अंतिम निकाल

अंडर ११ मुली – १. ह्रिधान गाडेकर (छत्रपती संभाजीनगर), २. शंतनू कवठेकर (अमरावती), ३. रुद्र ताठे (छत्रपती संभाजीनगर) आणि यशोवर्धन राजळे (छत्रपती संभाजीनगर).

अंडर ११ मुले – १. अरवा शेलार (पुणे), २. आराध्य आनंद लाहोटी (पुणे), ३. इशा अंबेकर (छत्रपती संभाजीनगर) व सर्वज्ञ महाजन (अमरावती).

अंडर १३ मुली – १. तन्वी कडू (अमरावती), २. माही निशान (अमरावती), ३. अद्विती प्रदीप खांड्रे (पुणे) व आराध्या वराडे (छत्रपती संभाजीनगर).

अंडर १३ मुले – १. सिद्धांत शर्मा (जळगाव), २. शिवराज कडू (अमरावती), ३. अर्श पैलवान (छत्रपती संभाजीनगर) व वंश जाधव (अमरावती).

अंडर १५ मुले – १. बुरहान भानपूरवाला (पुणे), २. साईराज भुतेकर (छत्रपती संभाजीनगर), ३. मुदस्सीर पटेल (छत्रपती संभाजीनगर) व यश हेमनानी (जळगाव).

अंडर १५ मुली – १. जिज्ञासा मुराडे (अमरावती), २. प्रशाब्दी वानखडे (अमरावती), ३. दिव्या दाभाडे (सांगली) व शिबा साहा (अमरावती).

अंडर १७ मुली – १. आस्था आनंद लाहोटी (पुणे), २. इशा देशपांडे (जळगाव), ३. आर्या ठाकरे (अमरावती) व मिताली पवार (जळगाव).

अंडर १७ मुले – १. अलाय अग्रवाल (पुणे), २ शेख अयान हसन (लातूर), ३. रुद्रानसिंग बडगुजर (अमरावती) व प्रशिल ठाकरे (अमरावती).

पुरुष गट – १. छत्रपती संभाजीनगर (आनंद डोभाळ, संदीप बोडखे, हर्षल काळवत्रे, दीपक गारखेडे, अमोल लोडवाल). २. पुणे (पृथ्वीराज भोसले, सौरभ झोडगे, प्रथमेश बेलिडकर, मदन ढाकणे, सुरज गामे).

३. अमरावती (भाऊसाहेब जाधव, प्रकाश अरेकर, सचिन दिधाटे, महेश चव्हाण, सागर वाघ) आणि परभणी (पवन राऊत, वैभव कांगणे, विलास पोळ, संतोष कांगणे, मयूर मुंढे).

महिला गट – १. परभणी (श्रद्धा सोनटक्के, शितल खोंडे, योगेश्वरी शेळके, साक्षी कार्लेवाड, कल्पना बोबडे). २. छत्रपती संभाजीनगर (तृप्ती कदम, छाया मोरे, रोहिणी काळवत्रे, उमा कल्याण गाडेकर). ३. पुणे (दुर्गा तनपुरे, मोहिनी बोरुडे, साक्षी मांगल्यम, प्रियाक हिप्परकर, स्वप्नांजली काबरा) आणि वाशिम (ऐश्वर्या बोकाडे, पल्लवी सुखचैन, शुभांगी काटेकर, अश्विनी मोराळे, संध्याराणी देवकाते).

पुरुष गट दुहेरी – १. प्रदीप जाधव व पवन तायडे (छत्रपती संभाजीनगर), २. बाळू गोरे व प्रज्वल दापसे (पुणे), ३. सचिन चाळिसगावकर व नितीन महाले (वाशिम) व सतीश मुंढे व दत्तात्रय निलगे (नांदेड).

महिला गट दुहेरी – १. संजीवनी सलामे (अमरावती) व राणी मुंडे (अमरावती), २. ऋतुजा सावंत (छत्रपती संभाजीनगर) व सुषमा केदार (छत्रपती संभाजीनगर), ३. राजश्री चौधरी (जळगाव) व रिद्धी शाह (जळगाव) आणि चैताली ढगे (नांदेड) व राजनंदा अंतुरे (नांदेड).

सिनियर मिक्स डबल – १. सृष्टी देशमुख (पुणे) व विशाल झोडगे (पुणे), २. जयेश पाटील (धुळे) व पल्लवी पाटील (धुळे), ३. पायल कोकाटे (अमरावती) व जय सरादे (अमरावती) आणि ऐश्वर्या खंडारे (नांदेड) व वैभव तुगावे (नांदेड).

ज्युनिअर मुले – १. छत्रपती संभाजीनगर (किरण मानकर, रितेश कापसे, शुभम धोंडकर, आदित्य मालुसरे, अभिजीत धांडे), २. परभणी (गजानन गायकवाड, सत्यजीत दुबे, हर्षवर्धन लोळे, चैतन्य चित्रे, कृष्णा गायकवाड), ३. अमरावती (विरोचन काळमेघ, आयुष कपिले, अंशुमन सोनोने, निर्भय महानकर, हर्षदीप आठवले) आणि अहिल्यानगर (हनुमंत गर्जे, प्रतीक बारगजे, जनार्धन दातीर, विनोद केदार, ओम सानप).

ज्युनियर मुली – १. परभणी (वैष्णवी मुदखडे, गायत्री गायकवाड, वैष्णवी गिरी, हर्षदा लोळे, तनुश्री जोंधळे), २. छत्रपती संभाजीनगर (नंदिनी वाणी, गायत्री लांडगे, प्रिया शेलार, कोमल बिमरोट, वृषाली भोसले), ३. वाशिम (ऋतुजा खाजभाजे, सुहानी महाले, समृद्धी कड, सिद्धी महाले, निधी गवई) व जळगाव (हर्षिता पाटील, युक्ता पाटील, पायल पाटील, अस्मी तिवारी, खुशी सोनवानके).

ज्युनियर मुली दुहेरी – १. भक्ती चव्हाण व ईश्वरी गायकवाड (परभणी), २. आकांक्षा बोरकर व कावेरी शंकपाऊले (नांदेड), ३. हर्षिता पाटील व युक्ता पाटील (जळगाव) आणि साक्षी कोळी व कस्तुरी दमाय्यावर (पुणे).

ज्युनियर मिक्स डबल – १. हर्षदा टेकाळे व सागर घुनावत (परभणी), २. वैष्णवी गोलवाल व विश्वजीत बेंडे (छत्रपती संभाजीनगर), ३. रिद्धी वानखडे, हेमंत गोलंबे (अमरावती) आणि आराध्या महाले व सोहन बिजवे (वाशिम).

ज्युनियर मुले दुहेरी – १. पार्थ रोहिदास गाडेकर व अजिंक्य कैलास शिवणकर (छत्रपती संभाजीनगर), २. करण तसेवाल व शेख अरिफ (जालना), ३. सुश्रुत खाकरे, राज काळेगोरे (नांदेड) व सार्थक शेळके, सार्थक नरसिंगकर (अमरावती).

पुरुष गट एकेरी – १. अवदेश यादव (पुणे), २. ऋषिकेश जामनिक (अमरावती), ३. जीवनसिंग दुलहोत (छत्रपती संभाजीनगर) आणि रुद्र बहुरे (परभणी).

महिला गट एकेरी – १. कहू पारेख (पुणे), २. राधिका इजाते (परभणी), ३. रिया कासार (अमरावती) व अंजली भाटे (नांदेड).

ज्युनियर मुले एकेरी – १. आदित्य घोडके (छत्रपती संभाजीनगर), २. प्रतीक टाक (परभणी), ३. रेहान बेग (छत्रपती संभाजीनगर) आणि तेजस ताटे (परभणी).

ज्युनियर मुली एकेरी – १. अस्मिरा बेग (छत्रपती संभाजीनगर), २. आराधना ताटे (परभणी), ३. सई इजाते (परभणी) आणि आर्वी रैना (पुणे). 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *