
जळगाव ः महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने घेण्यात येणाऱ्या आंतर जिल्हा मुलांच्या क्रिकेट स्पर्धेसाठी जळगाव जिल्हा मुलांचा संघ निवडण्यासाठी निवड चाचणीचे आयोजन रविवारी (२२ जून) सकाळी ९ वाजता करण्यात आले आहे.
ही निवड चाचणी जैन स्पोर्ट्स अकॅडमीच्या क्रिकेट मैदानावर, डी मार्ट जवळ विद्या इंग्लिश शाळेच्या मागे जळगाव येथे आयोजित करण्यात आली आहे. सर्व इच्छुक मुलांनी या निवड चाचणीत जास्तीत जास्त संख्येने आपला सहभाग https://forms.gle/psYkcEsNUsXr4Fe4A या लिंकवर जाऊन गुगल फॉर्म व ऑनलाईन निवड चाचणी फी १०० रुपये भरून आपला सहभाग नोंदवावा. तसेच आपले आधार कार्ड अपलोड करावे तसेच निवड चाचणीसाठी क्रिकेट साहित्य पांढरा गणवेश व शूज ओरिजनल आधार कार्ड सोबत आणावे, असे आवाहन जळगाव जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अतुल जैन यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सचिव अरविंद देशपांडे (९४०४९५५२०५) व सहसचिव अविनाश लाठी (९८२२६१६५०३) यांच्याशी संपर्क साधावा.