
मनमाड चे भूषण असलेल्या छत्रे विद्यालयाचा ९७ वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात साजरा झाला. प्रारंभी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन व प्रतिमा पूजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम दिंडोरकर यांनी भूषविले. या प्रसंगी मुख्याध्यापक प्रवीण व्यवहारे यांनी शाळेच्या प्रगतीचा अहवाल सादर केला. संचालक नाना कुलकर्णी, प्रसाद पंचवाघ, संगीता पोतदार, संदीप देशपांडे, दिघीळे गुरुजी, रमाकांत मंत्री, डॉ इंगळे यांनी आपल्या मनोगतातून शाळेच्या उज्वल यशाच्या परंपरेचा उहापोह केला व शाळेच्या स्थापने पासून वेळोवेळी आपले तन, मन, धन अर्पण करून मान्यवरांनी केलेले मोलाचे योगदान अधोरेखित करून त्यांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
काही विद्यार्थी व पालकांनीही आपल्या मनोगतातून शालेय व्यवस्थापन व शिक्षक वर्गाचे कौतुक केले. तसेच या प्रसंगी शाळेचा माजी विद्यार्थी आंतरराष्ट्रीय खेळाडू साईराज राजेश परदेशीच्या पालकांचा तसेच राष्ट्रीय पदक विजेती आनंदी विनोद सांगळे व इयत्ता दहावी आणि बारावीच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा पुष्पगुच्छ व रोख रक्कम देऊन सत्कार करण्यात आला. दहावी वर्गाचे शिक्षक गुणेश गुजर, एस यु देशपांडे, ए बी देसले यांचा सत्कार करण्यात आला. दिंडोरकर यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात शाळेच्या उत्कृष्ट मॅनेजमेंटचे व सतत सर्वोच्च निकालाची परंपरा राखण्यासाठी मेहनत करणाऱ्या शिक्षक वर्गाचे कौतुक केले.
या कार्यक्रम प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम दिंडोरकर, सचिव दिनेश धारवाडकर, संचालक बी एस कुलकर्णी, नाना कुलकर्णी, संचालक व पर्यवेक्षक प्रसाद पंचवाघ, मुख्याध्यापक प्रवीण व्यवहारे, उपमुख्याध्यापक संदीप देशपांडे, वरिष्ठ पर्यवेक्षिका संगीता पोतदार, प्राथमिक विभागाचे प्रमुख दिघोळे गुरुजी, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक मोरे, बालवाडी विभागाच्या मुख्याध्यापिका गवते, माजी मुख्याध्यापक गाडगीळ पी बी, पवार डी टी, थोरात तसेच देणगीदार कौशल शर्मा, गुरुजीतसिंग कांत, शशिकांत व्यवहारे, रमाकांत मंत्री, विजय बेलदार, सुमंत अंबर्डेकर, नयना कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक देसले यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आंबर्डेकर यांनी केले. ए बी भोये यांनी आभार मानले.