
सोलापूर ः डॉ व्ही एम मेडिकल कॉलेज कर्मचारी सहकारी पतसंस्था चषक बुद्धिबळ स्पर्धा विजापूर रोडवरील सुंदर मल्टीपर्पज हॉल येथे रविवारी (२२ जून) सकाळी १० वाजता सुरू होणार आहे.
पतसंस्थेच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त ही स्पर्धा श्री रमा जगदीश बहुउद्देशीय महिला उत्कर्ष संस्थेच्या वतीने व सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनच्या सहकार्याने आयोजित केली आहे. या स्पर्धेत रोख बक्षीस, ९० चषक व २० मेडल्स असे एकूण ३० हजार रुपयांची बक्षिसे देण्यात येणार आहेत. ही स्पर्धा ८, ९, १०, ११, १४, १७ व १९ वर्षे या वयोगट व खुल्या गटात आयोजित केली आहे. जगन्नाथ शिंदे चॅम्पियन चषक मालिका दोनमध्ये विजयी होणाऱ्या ९ खेळाडूंना बुद्धिबळाचे घड्याळ बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे. नाव नोंदणीसाठी सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशन सचिव शरद नाईक (9423337346) यांच्याशी संपर्क करावा असे आवाहन पतसंस्थेचे अध्यक्ष व्ही व्ही कमटम यांनी केले आहे.