
मुंबई ः पनवेल शहर किकबॉक्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचे आयोजन सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या केवाळे शाळेमध्ये करण्यात आले होते. या स्पर्धेत खांदा कॉलनी शाखेच्या संघाने २४ पदके जिंकून विजेतेपद पटकावले.
या स्पर्धेत एकूण २०८ खेळाडू सहभागी झाले होते. त्यामध्ये खांदा कॉलनी मधील प्रतीक कारंडे यांच्या मार्गदर्शनाखाली २४ खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत ६ सुवर्णपदक, ९ रौप्यपदक आणि ९ कांस्यपदक पटकावली.
विजेत्या खेळाडूंची २६ ते २९ जून रोजी पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय किकबॉक्सिंग स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. विजेत्या स्पर्धकांना खांदा कॉलनी शाखेचे मुख्य प्रशिक्षक प्रतीक कारंडे व सहाय्यक प्रशिक्षक प्रथम बहिरा यांचे मार्गदर्शन लाभले. विजेत्या खेळाडूंचे पनवेल शहर किकबॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष परेश दादा ठाकूर, सचिव डॉ मंदार पनवेलकर, कार्याध्यक्ष निलेश भोसले, युनायटेड शोतोकान कराटे असोसिएशनचे उपाध्यक्ष रवींद्र म्हात्रे, वरीष्ठ प्रशिक्षक संजय पाटील यांनी अभिनंदन केले आणि भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
विजेते खेळाडू
सुवर्णपदक – ओम माळी, संस्कृती जाधव, स्पर्श कांबळे, सौम्या पाटोळे, प्रज्वल शर्मा, तेजल भोईटे.
रौप्यपदक – अर्णव गावंड, अथर्व शेलार, शाश्वत सोरते, एनाक्षी पॉल, दिव्यांश राम, मानव बहेकर, आभास म्हात्रे, अद्वैत गांगुर्डे, विराज पिचड.
कांस्यपदक – भक्ती माळी, ओमकार महाडिक, सानवी सांगरे, ध्रुवी पाटोळे, साई कोकिटकर, ध्रुव सुराणा, उमर अन्सारी, सोहम पडवळे, विहान गोळे.