विवान, विहान, श्रेया, हिमांशू, आयुष, ओम यांना आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन प्राप्त

  • By admin
  • June 19, 2025
  • 0
  • 18 Views
Spread the love

सोलापूर ः सोलापूर येथे गेल्या सात वर्षांपासून कार्यरत असलेल्या चेस इन स्कूलच्या प्रशिक्षिका आणि पी आर चेस वर्ल्डच्या सह-संस्थापिका वरिष्ठ राष्ट्रीय पंच रोहिणी तुम्मा यांच्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन प्राप्त झाले आहे. हे सर्व विद्यार्थी जिल्हास्तरीय व राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये गेल्या तीन-चार वर्षांपासून अव्वल स्थान पटकवीत आहेत.

या अकॅडमी मध्ये ऑफलाइन तसेच ऑनलाईन अशा दोन्ही प्रकारात प्रशिक्षण देण्यात येते. ऑनलाईन मध्ये भारतासह ऑस्ट्रेलिया, अमेरिका, कॅनडा, दुबई, इंग्लंड व श्रीलंका या देशातही प्रशिक्षण देण्याचे काम करीत आहे. सोलापुरातील विवान दासरी, विहान कोंगारी, श्रेया संदूपटला, हिमांशू व्हनगवडे, आयुष गायकवाड आणि ओम निरंजन यांनी आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ फिडे मानांकन स्पर्धेमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत जागतिक बुद्धिबळ संघटनेच्या जलदगती व अति जलदगती प्रकारात आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन प्राप्त केले आहे.

के एल ई स्कूल मध्ये शिकत असलेला विवान दासरी याने पुण्यामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त खेळाडूंना पराभवाचा धक्का देत जलदगती बुद्धिबळ स्पर्धेत १५८० आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन प्राप्त केले आहे.

श्री सिद्धेश्वर स्कूल मध्ये शिकत असलेल्या विहान कोंगारी याने पुण्यामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत उत्कृष्ट खेळ करीत आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त खेळाडूंना पराभवाचा धक्के देत जलदगती आणि अति जलदगती अशा बुद्धिबळाच्या दोन्ही प्रकारात अनुक्रमे १४७० व १४२१ आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन प्राप्त केले आहे.

ज्ञान प्रबोधिनी स्कूल मध्ये शिकत असलेली श्रेया संदूपटला हिने सुद्धा पुण्यामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त खेळाडूंना नमवीत जलदगती बुद्धिबळ स्पर्धेत १४९० आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन प्राप्त केले आहे.

सेंट जोसेफ स्कूल मध्ये शिकत असलेला हिमांशू व्हनगवडे याने सुद्धा पुण्यामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त खेळाडूंचा पराभव करीत जलदगती बुद्धिबळ स्पर्धेत १४३४ आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन प्राप्त केले आहे.

एल एफ सी स्कूल मध्ये शिकत असलेले आयुष गायकवाड आणि ओम निरंजन ह्यांनी पुण्यामध्ये झालेल्या आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन बुद्धिबळ स्पर्धेत चमकदार कामगिरी करीत आंतरराष्ट्रीय मानांकन प्राप्त विरोधी खेळाडूंना पराभवाचा धक्के देत जलदगती बुद्धिबळ स्पर्धेत अनुक्रमे १४५१ व १४०३ आंतरराष्ट्रीय फिडे मानांकन प्राप्त केले आहे.

विवान, विहान, श्रेया, हिमांशू, आयुष आणि ओम यांना आंतरराष्ट्रीय पंच पवन राठी, वरिष्ठ राष्ट्रीय पंच व बुद्धिबळ प्रशिक्षक रोहिणी तुम्मा आणि राज्य पंच व बुद्धिबळ प्रशिक्षिका जयश्री कोंडा यांचे मार्गदर्शन लाभले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *