< window.dataLayer = window.dataLayer || []; function gtag(){dataLayer.push(arguments);} gtag('js', new Date()); gtag('config', 'G-1H4537RJQY'); माथेरान व्हॅली स्कूलकडून खेळाडूंचा गुणगौरव  – Sport Splus

माथेरान व्हॅली स्कूलकडून खेळाडूंचा गुणगौरव 

  • By admin
  • June 20, 2025
  • 0
  • 120 Views
Spread the love

मुंबई ः  माथेरान व्हॅली स्कूलमध्ये गुणवान खेळाडूंचा गौरव करण्यात आला. शाळेला सुरुवात होताच हा गुणगौरव कार्यक्रम घेण्यात आला. 

माथेरान व्हॅली स्कूलमध्ये अनेक खेळ व विविध कार्यक्रमांचे आयोजन सातत्याने करण्यात येत असते. तसेच पहिली ते दहावी, बारावीसाठी स्पोर्ट्स, आरएसपी आणि कला व सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात येतात. भारत एज्युकेशन सोसायटीच्या माध्यमातून विविध कार्यक्रमाचे नियोजन केले जाते. शाळेच्या मुख्याध्यापिका मृदुला पटेल यांच्या निर्देशनातून शाळेचे योग्य कामकाज चालते.

शाळेच्या विद्यार्थ्यांनी अनेक खेळांमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे. विविध खेळांमध्ये आपले कौशल्य सादर करुन खेळाडू विद्यार्थ्यांनी शाळेचे नावलौकीक वाढवला आहे. वैदेही जाधव हिने बँकॉक आंतरराष्ट्रीय थाई बॉक्सिंग यश मिळविले , दिशांत भोईरने आंतरराष्ट्रीय थाई बॉक्सिंग प्रो – लीग बेल्ट जिंकले. यश इंदलकर व निसर्गा गवळी आणि वेदिका, जुईने आईस स्टॉक व क्रिकेट मधून पारितोषिके मिळविली होती.

नामांकित वसतिगृहचेही शालेय व फेडरेशन खेळात वर्चस्व राहिले. अशा अनेक खेळातील प्राविण्याला वाव मिळावा व समज्यात खेळाचा प्रचार – प्रसार वाढून देशासाठी अनेक ऑलिम्पिक खेळाडू तयार व्हावेत याकरिता विजयी खेळाडूंचे स्वागत करून नेरळ आणि वंजारपाडा परिसरात मिरवणूक काढण्यात आली.
मिरवणुकीत शाळेच्या मुख्याध्यापिका मृदुला पटेल, सुपरवायझर मीना अंबोरे व कुंदा पाटील तर क्रीडा प्रशिक्षक स्वप्निल अडूरकर, करण बाबरे तसेच शिक्षकवृंद यांचा समावेश होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *