एनसीसी हेडक्वार्टर पुणे येथे योगदिन उत्साहात साजरा

  • By admin
  • June 21, 2025
  • 0
  • 180 Views
Spread the love

ऋषिकेश वालझाडे

पुणे ः जागतिक योग दिनानिमित्त एनसीसी ग्रुप हेडक्वार्टर पुणे या ठिकाणी योग दिनाचे उत्कृष्ट नियोजन करण्यात आले होते.

एनसीसी ग्रुप हेडक्वार्टर येथे १ महाराष्ट्र सिंगनल कंपनी पुणे यांनी आंतरराष्ट्रीय योग दिनाचे उत्कृष्ट नियोजन केले होते. या योग शिबिरात पुणे जिल्ह्यातील १० स्कूल, ३ कॉलेजचे एकूण ४१६ एनसीसी कॅडेट उत्साहाने सहभागी झाले होते.

या योग शिबिरात राष्ट्रीय योग प्रशिक्षक सीमा शितोळे यांनी सूर्यनमस्कार, योगासन यांचे प्रात्यक्षिक सादर केले. या योग सादरीकरणात एनसीसी कॅडेट सहभागी झाले होते. या आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त एनसीसी ग्रुप हेडक्वार्टर ट्रेनिंग ऑफिसर कर्नल राजेश सिंह, विंग कमांडर एस एस मराठे (कमांडिंग ऑफिसर SQN, NCC) त्याच बरोबर कर्नल आर के चौहान (कमांडिंग आॅफिसर १ महाराष्ट्र सिंगनल कंपनी, पुणे) यांनी योग प्रात्यक्षिक केले. तसेच सर्व एनसीसी कॅडेट्सना कर्नल आर के चौहान यांनी योगा दिनाचे महत्त्व सांगितले तसेच मार्गदर्शन केले व शुभेच्छा दिल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *