आंतरराष्ट्रीय योग दिन छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेत साजरा

  • By admin
  • June 21, 2025
  • 0
  • 13 Views
Spread the love

योग साधनेमुळे शरीर व मन स्वास्थ्य लाभते – डॉ श्रीकांत देशमुख

छत्रपती संभाजीनगर ः एनसीआयएसएम आयुष मंत्रालय, नवी दिल्ली, आयुष संचालनालय, महाराष्ट्र व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या निर्देशानुसार कांचनवाडी छत्रपती संभाजीनगर येथील सीएसएमएसएस छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेमध्ये ११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिवसा अंतर्गत विविध कार्यक्रम आणि योग शिबिरे आयोजित करून उत्साहात साजरा करण्यात आला.

आपल्या भारतीय प्राचीन संस्कृती, परंपरा यांमध्ये योग, योगासने, योगसाधना यांना अनन्य साधारण महत्त्व आहे. अगदी प्राचीन काळापासून ऋषीमुनी, साधुसंत यांनी वेळोवेळी योगाचे महत्त्व, त्याचे फायदे आणि त्याची गरज पटवून दिलेली आहे. आजच्या काळातील धकाधकीच्या जीवनात योगाच्या माध्यमातून आपण आपले शरीर तर तंदुरुस्त ठेवू शकतो; शिवाय मन आणि आत्मा यावरही चांगले संस्कार करू शकतो. तन आणि मन यांचा एकत्रित व्यायाम म्हणजे योग, असे म्हणता येईल.योग करण्यासाठी कोणत्याही प्रकारची साधन सामुग्रीची आवश्यकता नसते. सहज, सोपा कुठेही, कधीही करता येण्याजोगा सार्वदैहीक व्यायाम म्हणजे योग होय. योग साधनेमुळे शरीर व मनाचे स्वास्थ्य लाभते.  यामुळेच आज जगभरात योगाचे महत्त्व वाढत आहे. जगभरातील विविध देशांमध्ये योग दिन साजरा केला जातोय. आणि भारत हे याचे प्रमुख केंद्र मानले जात आहे.असे प्रतिपादन संस्थेचे प्रशासकीय अधिकारी डॉ श्रीकांत देशमुख यांनी केले.

११ व्या आंतरराष्ट्रीय योग दिनास आयुर्वेद महावि‌द्यालय, दंत महावि‌द्यालय, छत्रपती शाहू अभियांत्रिकी महाविद्‌यालय, तंत्रनिकेतन महाविद्यालय, कृषी महावि‌द्यालयामधील अध्यापक, प्राध्यापक, शिक्षक वृंद, वि‌द्यार्थी वर्ग, शिक्षकेतर कर्मचारी मोठ्‌या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमांतर्गत प्रार्थना पूरक व्यायाम असणे दंड स्थिती बैठक स्थिती विपरीत स्थिती प्राणायाम, एकादस ओमकार, शांतीपाठ घेण्यात आले तसेच योग संकल्पचे वाचन करण्यात आने संस्थेच्या आयुर्वेद महावि‌द्यालयात स्वस्थवृत्त एवं योग विभागांतर्गत विविध उपक्रम राबविण्यात आले, समाजामध्ये सुद्धा योगाची जनजागृती करायची आहे “वन अर्थ वन हेल्थ” या संकल्पनेतून हंड्रेड डेज ऍक्टिव्हिटीअंतर्गत आपण आयुर्वेद महावि‌द्यालयामध्ये योग संगम, हरित योग, योगा ट्रेकिंग, योगा फॉर किड्स फॉर यू, निबंध स्पर्धा, व्हिडिओ स्पर्धा, चित्र प्रदर्शन, विविध व्याख्याने पूर्व योगासन सत्र असे विविध उपक्रम घेण्यात आले.

या कार्यक्रमासाठी सर्व वि‌द्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद नोंदवला होता. या कार्यक्रमानिमित बक्षीस वितरण देखील करण्यात आले आहे. बक्षीस प्राप्त वि‌द्यार्थ्यांना प्रमाणपत्र व स्मृती चिन्ह देऊन गौरविण्यात आले. या शिबिराकरिता प्राचार्य डॉ श्रीकांत देशमुख, अधिष्ठाता डॉ लता काळे, संचालक डॉ जगदीश जहागीरदार, प्राचार्य डॉ गणेश डोंगरे,  प्राचार्य डॉ प्रवीण बैनाडे, प्राचार्य डॉ शशिकांत डिकले, उप-प्राचार्य डॉ जयश्री देशमुख, मॅनेजर एचआर अनिल तायडे व जनसंपर्क अधिकारी संजय अंबादास पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ वनिता पुरी यानी केले. तसेच या योग क्रियांचे प्रात्यक्षिक योगशिक्षिका रूपा जाधव तसेच नवनाथ चित्रक यानी केले.  डॉ प्रतिभा काळे यांनी आभार व्यक्त केले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत, महाराष्ट्र गीत व विद्यापीठ गीताने करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *