धर्मवीर संभाजी विद्यालयात योग दिन उत्साहात साजरा

  • By admin
  • June 21, 2025
  • 0
  • 24 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर ः पंडित दीनदयाल उपाध्याय शिक्षण संस्थेच्या धर्मवीर संभाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जागतिक योगा दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

क्रीडा भारती व भारतीय योग संस्था यांच्या सहकार्याने योग गुरू तुळशीराम सरोदे, विद्या सरोदे, शिरसाट, देशपांडे, श्रावणी सरोदे, सिंधुताई पाटील, जोशी, वंदना सराफ, हिरा गायकवाड, संगीता जाधव, वंजारीताई, आर बी पाटील यांनी योगाचे प्रात्यक्षिकाद्वारे विद्यार्थ्यांना दाखवले आणि शिक्षकांना मार्गदर्शन केले.

विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी योगासनाचा आनंद घेत शिक्षक आणि इतर कर्मचारी देखील यावेळी योगासनामध्ये सहभागी झाले होते. या प्रसंगी शाळेतील प्राचार्य लक्ष्मण मेमाणे, पर्यवेक्षक दिलीप गायके, महेश कुलकर्णी, क्रीडा विभाग प्रमुख विनायक राऊत आणि सर्व शिक्षक, शिक्षिका आणि शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *