
छत्रपती संभाजीनगर : श्री सरस्वती भुवन प्रशाला येथे उत्साहात जागतिक योग दिन साजरा करण्यात आला. प्रशालेतील १२०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.
प्रारंभी प्रशालेचे मुख्याध्यापक विश्वरूप निकुंभ यांनी योग दिनाचे महत्त्व सांगून विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. क्रीडा शिक्षक संजय कंटुले, सुरज सुलाने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशालेतील सुमारे १२०० विद्यार्थ्यांनी योगासने केली.
विद्यार्थ्यांनी प्रार्थना, सर्वांग सुंदर व्यायाम, विविध प्रकारची योगासने, प्राणायाम इ अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने सादर केले. शांतीपाठाने कार्यक्रमाची सांगता झाली. यावेळी आर्यन सोनवणे, शिवम पाटील, शर्विल देशमुख ,अर्णव कांबळे, समर्थ जोशी आणि श्रेयश उगले या विद्यार्थ्यांनी काही विशेष योगासनांची प्रात्याक्षिके दाखवली. यावेळी पर्यवेक्षक सुनील महालपुरे आणि सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी योग दिनाच्या कार्यक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला.