ऑलिम्पिक दिनानिमित्त पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे स्क्वॉश प्रशिक्षण शिबीर

  • By admin
  • June 22, 2025
  • 0
  • 25 Views
Spread the love

उंड्री येथील महाराष्ट्र स्क्वॉश अकादमीत सोमवारपासून आयोजन

पुणे ः पुणे जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातर्फे जागतिक ऑलिम्पिक दिवस साजरा करण्यात येणार आहे. तसेच स्क्वॉश खेळाचे १५ दिवसांचे निशुल्क प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी दिली.

२३ जून हा दिवस जागतिक ऑलिम्पिक दिवस म्हणून जगभर साजरा केला जातो. ऑलिम्पिक दिवस महाराष्ट्रात आणि पुणे शहरात मोठ्या उत्साहाने सोमवारी साजरा करण्यात येणार आहे. सन २०२८ मध्ये अमेरिका येथे होणाऱया ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये स्क्वॉश या खेळाचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे ऑलिम्पिक दिनानिमित्त स्क्वॉश खेळाचे १५ दिवसांचे प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. हे शिबीर २३ जून ते ७ जुलै या कालावधीत महाराष्ट्र स्क्वॉश अकादमी, उंड्री (पुणे) या ठिकाणी घेण्यात येणार आहे. या अकादमीत आंतरराष्ट्रीय दर्जाचे तीन ग्लास कोर्ट उपलब्ध असून या स्क्वॉश कोर्टवर तज्ज्ञ प्रशिक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली १५ दिवस मोफत प्रशिक्षण शिबीर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरात सहभागी होणाऱया खेळाडूंना निवास व भोजन व्यवस्था स्वतः करावयाची आहे. या शिबिरात अधिकाधिक शाळा व महाविद्यालयातील खेळाडूंनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी महाराष्ट्र स्क्वॉश रॅकेट असोसिएशनचे अध्यक्ष डॉ प्रदीप खांड्रे (७४९८२४५०३२, ९९२११५९०३७३) यांच्याशी संपर्क साधावा, असे जगन्नाथ लकडे यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *