छत्रपती संभाजीनगर शहरात आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिनाचे आयोजन

  • By admin
  • June 22, 2025
  • 0
  • 49 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सर्व क्रीडा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक दिन साजरा करण्यासाठी सोमवारी (२३ जून) विविध उपक्रमांच्या आयोजन करण्यात आले आहे.

ऑलिम्पिक दिनानिमित्त सोमवारी श्री गजानन महाराज मंदिर चौक गारखेडा परिसर येथून विभागीय क्रीडा संकुलपर्यंत रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. श्री गजानन महाराज मंदिर चौकामध्ये मल्लखांब, वुशु, योगा, कराटे आदी खेळांचे प्रात्यक्षिक सादर करण्यात येणार आहे.

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गुणवंत खेळाडू नॅशनल गेम्स स्पर्धेतील व खेलो इंडिया युथ गेम्स स्पर्धेतील खेळाडूंच्या हस्ते मशाल प्रज्वलित करून मशाल श्री गजानन महाराज मंदिर चौकापासून ते विभागीय क्रीडा संकुलपर्यंत खेळाडू घेऊन जाणार आहेत. स्केटिंगचे खेळाडू देखील या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत.

या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य गृहनिर्माण इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, महाराष्ट्र विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे उपस्थित राहणार आहेत. रॅलीचा समारोप विभागीय क्रीडा संकुल येथे संपन्न होणार असून यावेळी शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते खेळाडू, प्रशिक्षक व संघटक यांचा सत्कार करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे सदस्य तथा छत्रपती संभाजीनगर विभागाचे समन्वयक प्रा उदय डोंगरे, गोविंद शर्मा, फुलचंद सलामपुरे, मकरंद जोशी, गोकुळ तांदळे, सुरेश मिरकर, पंकज भारसाखळे, दीपक रुईकर, भिकन आंबे, दिनेश वंजारे, महेश इंदापुरे, एकनाथ साळुंखे, मनजित सिंग दरोगा, कुलजीत सिंग दरोगा, सागर मगरे, गणेश कड, राकेश खैरनार, संतोष अवचार, तुषार आहेर, शिल्पा नेने आणि जिल्हा क्रीडा कार्यालयातील सर्व कर्मचारी आदी परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *