आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात योग दिन साजरा

  • By admin
  • June 22, 2025
  • 0
  • 26 Views
Spread the love

नाशिक ः शहापूर तालुक्यातील मोहिली-अघई येथील विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट (कोकमठाण) संचलित आत्मा मालिक शैक्षणिक व क्रीडा संकुलात आंतरराष्ट्रीय योग दिन आत्मा मालिक मेडिटेशन हॉल येथे अत्यंत उत्साहात संपन्न झाला.

या प्रसंगी संत भारत माता, संकुलाचे कार्याध्यक्ष तथा विश्वस्त उमेश जाधव, उपाध्यक्ष प्रकाश भट, स्थानिक व्यवस्थापन समितीचे सचिव अनंत गायकवाड, स्थानिक व्यवस्थापन समिती सदस्य प्रवीण मोरे, शालेय व्यवस्थापिका श्रीलथा नायर, व्यवस्थापक सामान्य प्रशासक प्रा. उल्हास पाटील, आत्मा मालिक इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीचे प्राचार्य डॉ. डी. डी. शिंदे, आत्मा मालिक इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य कैलास थोरात, आत्मा मालिक इंग्लिश मीडियम स्कूल अँण्ड ज्युनियर कॉलेजच्या प्राचार्या पौर्णिमा उपासनी यांच्यासह संकुलाचे विभागप्रमुख उपस्थित होते.

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयुष मंत्रालय भारत सरकार यांच्या परिपत्रकानुसार सामूहिक योगाभ्यासामध्ये योगिक सूक्ष्म व्यायाम, योगासने, प्राणायाम, ध्यान अभ्यास, सूर्यनमस्कार इत्यादी योगाभ्यास योग प्रशिक्षक पुरुषोत्तम पानबुडे यांनी उपस्थितांकडून करवून घेतले.  योग दिनानिमित्त विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात आल्या. यावेळी विविध स्पर्धेत विजयी विद्यार्थ्यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रे देऊन सन्मानित करण्यात आले. तसेच रँलीचे आयोजन करण्यात आले.

योगदिनाचे औचित्य साधून निसर्गाचे संवर्धन करण्यासाठी संस्थेच्या वतीने वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सावळीराम शिंदे यांनी केले. प्रा. उल्हास पाटील यांनी आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संगीत विभागाद्वारे स्वरांजली ग्रुपने संगीत सेवा दिली.संकुलाचे क्रीडा शिक्षक, प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग व सर्व विभाग प्रमुख यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *