छत्रपती संभाजीनगर ः पहिल्या जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धेत आर्चिस आठवले याने पाच गटात अंतिम फेरी गाठली आहे.
टेबल टेनिस स्पोर्ट्स वेल्फेअर असोसिएशनतर्फे या स्पर्धेचे आयोजन विभागीय क्रीडा संकुलात करण्यात आले आहे. स्पर्धेचा दुसरा दिवस आर्चिस आठवले याने पाच गटात अंतिम फेरी गाठून गाजवला.
विविध गटातील निकाल
१३ वयोगट मुले ः अध्ययन डेकाटे विजयी विरुद्ध अधिराज दर्डा, जयवर्धन बजाज विजयी विरुद्ध आर्यमन डेकाटे.
१३ वयोगट मुली ः अहानिका डेकाटे विजयी विरुद्ध रिती पाटणी, रवी पाटणी विजयी विरुद्ध श्रिया जांबुरे.
१५ वयोगट मुले ः आर्चिस आठवले विजयी विरुद्ध आरव संगनेरिया, श्लोक भारतीय विजयी विरुद्ध आर्यवीर दर्डा.
१५ वयोगट मुली ः सिद्धी जांबुरे विजयी विरुद्ध जनिषा शेजुळ, रवी पाटणी विजयी विरुद्ध अनाहिता डेकाटे.
१७ वर्षांखालील मुले ः आर्चिस आठवले विजयी विरुद्ध आरव संगनेरिया, वंशवर्धन बजाज विजयी विरुद्ध श्लोक भारतीय.
१७ वर्षांखालील मुली ः देवांशी तोष्णीवाल विजयी विरुद्ध सिद्धी जांबुरे.
१९ वर्षांखालील मुले ः आर्चिस आठवले विजयी विरुद्ध वंशवर्धन बजाज, आरव संगनेरिया विजयी विरुद्ध श्लोक भारतीय.
पुरुष एकेरी ः मनोज कनोडजे विजयी विरुद्ध रोहन मांडे, आर्चिस आठवले विजयी विरुद्ध श्लोक भारतीय.
महिला एकेरी ः मनीषा काळे विजयी विरुद्ध सृष्टी राजुर्जर.
३९ प्लस वयोगट ः श्रीपाद जोशी विजयी विरुद्ध प्रकाश दाभाडे, संजीव गायकवाड विजयी विरुद्ध अक्षय मारवाड.
४९ प्लस वयोगट ः प्रकाश झबडे विजयी विरुद्ध संतोष व्यास, देवेंद्र नाथ विजयी विरुद्ध संजीव गायकवाड.
५९ प्लस वयोगट : बी आर घनवट विजयी विरुद्ध गणेश चौहान, रवींद्र साळुंके विजयी विरुद्ध देवेंद्र नाथ.