
छत्रपती संभाजीनगर ः मशिप्र मंडळ संचालित देवगिरी महाविद्यालयामध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य प्रोफेसर डॉ अशोक तेजनकर यांनी योगाभ्यास, नियमित व्यायाम, तणाव मुक्त जीवनशैली, सुदृढ आरोग्य, सुदृढ युवक यासंबंधी मार्गदर्शन केले.
या योग शिबिरामध्ये योग शिक्षिका प्रा. बकुळ पाटील यांनी शिबिरार्थींकडून योगाभ्यास करून घेतला. या योगा प्रात्यक्षिक अभ्यासामध्ये ताडासन, पवन मुक्त आसन, भुजंगासन तसेच बैठक स्थितीतील, वज्रासन, त्रिकोणासन, शशांक आसन आणि कपालभाती प्राणायाम, नाडी शोधन प्राणायाम, ध्यान प्राणायाम आदी प्रात्यक्षिक करून घेतले.
या प्रसंगी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी योग प्रात्यक्षिकाचे सादरीकरण केले. या योग शिबिरासाठी उपप्राचार्य डॉ रवी पाटील, डॉ अपर्णा तावरे, डॉ गणेश मोहिते, प्रा. सुरेश लिपाने, प्रा अरुण काटे आदींसह प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी, विद्यार्थी यांची उपस्थिती होती. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ मन्साराम औताडे यांनी केले. डॉ शेखर शिरसाठ यांनी आभार मानले.