
अंबाजोगाई ः महाराष्ट्र फेन्सिंग असोसिएशनच्या मान्यतेने व बीड जिल्हा तलवारबाजी संघटनेच्या संयुक्त विद्यमाने १७ वी मिनी व पाचवी चाइल्ड जिल्हास्तरीय फेन्सिंग अजिंक्यपद स्पर्धेचे उद्घाटन थाटामाटात संपन्न झाले.
या उद्घाटन समारंभाच्या प्रसंगी युवा नेते अक्षय मुंदडा, वैजनाथ देशमुख सोमेश्वर विद्यालय घाटनांदुरचे क्रीडा प्रमुख दत्ता देवकते, परमेश्वर वैद्य, आकाश बनसुडे, लक्ष्मण जाधव, स्वप्ना शिराळे, बीड जिल्हा तलवारबाजी संघटनेचे सचिव पिराजी कुसळे आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.
या कार्यक्रमाच्या उद्घाटनीय भाषणात अक्षय मुंदडा यांनी तलवारबाजी खेळाचे नियमाचे पालन करून खेळाडूंनी खेळाडूवृत्ती दाखवत सामने खेळावेत, अंबाजोगाई तालुक्यांमध्ये तलवारबाजी स्पर्धा होत आहे ही गौरवास्पद बाब आहे असे सांगून खेळाडूंनी या स्पर्धेत चांगल्या प्रकारे आपले कलागुण दाखवावे असे मत व्यक्त केले.
स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी बीड जिल्हा तलवारबाजी संघटनेचे अध्यक्ष गोविंद देशमुख, बीड जिल्हा क्रीडा अधिकारी अरविंद विद्यागर, महाराष्ट्र तलवारबाजी संघटनेचे सहसचिव डॉॉ पांडुरंग रणमाळ, अंबाजोगाई तालुका क्रीडा अधिकारी सतीश राठोड यांचे मार्गदर्शन लाभले.
या स्पर्धेमध्ये पंच म्हणून आकाश बनसुडे यांनी काम पाहिले. कार्यक्रमाचा समारोप पिराजी कुसळे यांनी केला. जिल्हास्तरीय तलवारबाजी स्पर्धेसाठी बीड जिल्ह्यातून ३७ खेळाडूंनी सहभाग घेतला. खेळाडू, संघ व्यवस्थापक, मार्गदर्शक आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी वैष्णवी जाधव, अंकुश गायकवाड, शिवकुमार मुरुडकर, सुजाता गाढवे, श्रेयश गायके, ओम बडे, कल्पेश जाधव, नैतिक ढेंबरे, रणवीर सोळंके यांनी परिश्रम घेतले.