मशाल रॅलीद्वारे नांदेड येथे ऑलिम्पिक दिन साजरा

  • By admin
  • June 23, 2025
  • 0
  • 21 Views
Spread the love

नांदेड ः नांदेड जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशनतर्फे २३ जून हा दिवस जागतिक ऑलिम्पिक दिन म्हणून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

जागतिक ऑलिम्पिक दिनानिमित्त नांदेड जिल्हा ऑलिम्पिक असोसिएशनतर्फे नांदेड शहरातील जुना मोंढा टॉवर ते श्रीगुरुगोविंदसिंग स्टेडियमपर्यंत मशाल रॅली काढण्यात आली. मशाल रॅलीचा शुभारंभ संत बाबा बलविंदरसिंग यांच्या हस्ते झेंडा दाखवून करण्यात आला. या प्रसंगी डॉ हंसराज वैद्य, जनार्दन गोपिले, जसविंदरसिंग रामगडिया, दीपक बच्चेवार, डॉ राहुल वाघमारे, जयपाल रेड्डी, रमेश नांदेडकर, बालाजी जोगदंड, विनोद जमदाडे, विक्रांत खेडकर, प्रलोभ कुलकर्णी आदी क्रीडा प्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *