
छत्रपती संभाजीनगर ः विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळ संचलित, भागीरथी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नालेगाव ता. वैजापूर येथे एनसीसी कार्यालयातर्फे एनसीसी युनिटला प्रशिक्षण देण्यासाठी पीआय हवालदार के ए भाई यांनी भेट दिली.
प्रशिक्षण दरम्यान परेड ग्राउंड, फायरिंगची थेरी तासिका घेण्यात आली. यावेळी विद्यालयाचे प्राचार्य बी एम हजारे, भरत निंबाळकर, प्रमोद पठारे, सुनील भवर, राजेश्वर विभुते, प्रमोद चव्हाण, गणेश जगताप, प्रमोद रिंढे, प्रवीण जाधव, मनीषा उभेदळ, रोहिदास त्रिभुवन, प्रवीण एस. जाधव, भरत भोपळे, निर्मला शिरसाठ, गंगाधर कटारे, गोकुळ पवार, योगेश शिंदे, जयश्री बोर्डे, सुरज साळवे, समाधान सुरासे, दर्शन पाटील, ज्ञानदेव तायडे, अमोल त्रिभुवन, उत्तम सरोवर, विशाल साबळे, सुनील बोडखे, किशोर साळुंखे आदी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.