४२ सायकलपटूंची पंढरपूर सायकल वारी यशस्वीरित्या पूर्ण 

  • By admin
  • June 24, 2025
  • 0
  • 23 Views
Spread the love

छत्रपती संभाजीनगर ः छत्रपती संभाजीनगर जिल्हा सायकलिंग संघटना आणि डॉ सुदाम बांगर यांच्या प्रेरणेतून ३४० किलोमीटरची पंढरपूर सायकल वारी यशस्वीरित्या पूर्ण केली.

छत्रपती संभाजीनगर ते पंढरपूर सायकल वारी शहरातील विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्यांनी दोन दिवसांत पूर्ण केली. सायकल वारीमध्ये ४२ सायकलपटूंनी सहभाग घेतला होता. या सायकल वारीमध्ये दहा वर्षांखालील दोन सायकलपटूंचा सहभाग होता हे विशेष. ही सायकलवारी सर्वांसाठी अध्यात्मिक, आरोग्यवर्धक आणि संघभावनेची अनोखी अनुभूती देणारी ठरली.

सायकल वारीला सीएसडीसीए सर्कलपासून सुरुवात झाली. उद्योजक विवेक देशपांडे, बांधकाम व्यावसायिक मोरेश्वर कुलकर्णी, स्वप्नील कुलकर्णी, उद्योजक सुरेश रोटे, उद्योजक ललित गांधी यांच्या प्रमुख  उपस्थितीत सायकल वारीला सुरुवात झाली. 

बिडकिन, पैठण, शेवगावमार्गे बीड जिल्ह्यातील कडा या ठिकाणी सायकल वारीचा पहिला मुक्काम झाला. दुसऱया दिवशी मिरजगाव, पाटेवाडी, कुर्डूवाडीमार्गे श्री क्षेत्र पंढरपूर येथे सायकल वारी पोहोचली. त्यानंतर दर्शन घेऊन तिसऱया दिवशी सायकलपटू शहरात दाखल झाले. 

या सायकल वारीमध्ये जिल्हा सायकलिंग संघटनेचे अध्यक्ष निखिल कचेश्वर, सचिव चरणजित सिंग संघा, डॉ अशोक बोलकर, डॉ प्रदीप देशमुख, डॉ संदीप शेळके, चंद्रकांत कदम, रोहिदास चौधरे, डॉ नारायण कालेगावकर, रवींद्र जोशी, गणेश तुंगेनवार, संतोष हिरेमठ, अमोल सोमवंशी, पोपट अळणजकर, कृष्णा भडेवार, डॉ दीपक कुकुंलोल, सई जोशी, शिवाजी झिरपे, ध्येयश झिरपे, अजय पांडे, अतुल जोशी, मनीष खंडेलवाल, नितीन लबडे पाटील आदी सायकलवीर सहभागी झाले होते. 

अर्निका, मनप्रीतने लक्ष वेधले
या सायकलवारीत अर्निका कचेश्वर आणि मनप्रीत कौर संघा या दहा वर्षांखालील सायकलपटूंनी सहभाग घेतला होता. या वारीमध्ये अर्निका व मनप्रीत या सायकलपटूंनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. तसेच सई जोशी, मैथिली देशपांडे यांनीही सायकलवारीत सहभाग घेतला होता. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *