
छत्रपती संभाजीनगर ः गुजरात राज्यातील भुज येथे होणाऱ्या राष्ट्रीय वरिष्ठ महिला हँडबॉल स्पर्धेसाठी वेरूळ येथील सायली वैभव किरगत हिची महाराष्ट्र संघात निवड झाली आहे.
सायली किरगत ही एमएसएम कॉलेज ऑफ फिजिकल एजुकेशनची विद्यार्थिनी असून गायकवाड ग्लोबल स्कूल येथे क्रीडा शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. हँडबॉल फेडरेशन ऑफ इंडिया यांच्या अंतर्गत भुज (गुजरात) येथे २८ जून ते ३ जुलै दरम्यान राष्ट्रीय वरिष्ठ महिला हँडबॉल स्पर्धा होणार आहे. या स्पर्धेसाठी हँडबॉल असोसिएशन महाराष्ट्र यांनी महाराष्ट्र संघाची निवड चाचणी २२ जून रोजी खारघर मुंबई येथे आयोजित केली होती. या निवड चाचणीत सायली किरगत हिने दमदार खेळी करीत महाराष्ट्र संघात आपले स्थान कायम केले.
तिच्या या निवडीबद्दल द हौशी हँडबॉल असोसिएशन छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष श्रीकांत जोशी, सचिव प्रभाकर भारसाखळे, कोषाध्यक्ष डॉ सत्यजीत पगारे, पंकज भारसाखळे, डॉ सचिन पगारे, संजय सातदिवे, जिल्हा क्रीडा अधिकारी बाजीराव देसाई, माजी क्रीडा अधिकारी गोकुळ तांदळे, एमएसएम प्राचार्य डॉ मकरंद जोशी, मैदान प्रमुख डॉ रफीक सिद्धिकी, डॉ कालिदास तादलापूरकर, डॉ माणिक राठोड, गायकवाड ग्लोबल स्कूलचे अध्यक्ष प्रो रामदास गायकवाड, संस्थापक अध्यक्ष कालिंदा गायकवाड, कुलभूषण गायकवाड, नंदकुमार दंदाले, प्राचार्य डॉ सुलेखा ढगे, यशवंत मोकाशी, गणेश बेटूदे, आशिष कान्हेड, मोहम्मद अख्तर कुरैशी यांनी अभिनंदन केले आहे.