क्रिकेट स्पर्धेत अन्वरीया ग्रुप संघाला विजेतेपद

  • By admin
  • June 24, 2025
  • 0
  • 13 Views
Spread the love

जळगाव ः नशिराबाद येथे सेवा फाऊंडेशन आयोजित दिवंगत माजी क्रिकेटपटू शेख जाकीर, फिरोज खान, जत्ताब खान,शेख बिस्मिल्ला, शेख जावेद, शेख तन्वीर, अब्दुल नबीयांच्या स्मरणार्थ ३० वयापेक्षा जास्त असलेल्या माजी खेळाडूंची मनियार लिजेंड क्रिकेट स्पर्धा नशिराबाद येथे पार पडली. त्यात एकूण ८ संघांनी सहभाग नोंदवला.

अंतिम सामना रायझिंग स्टार आणि अन्वारीया ग्रुप यांच्या दरम्यान खेळविण्यात आला रायझिंग स्टार संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ४ षटकात ७ गडी बाद फक्त २० धावा केल्या. गोलंदाजीत अन्वारीया ग्रुपतर्फे अब्दुल यांनी एक आणि मतीन शेख व मोहम्मद फजल यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

प्रतिउत्तरात अन्वारीया ग्रुप संघाने दोन षटकात तीन गडी बाद २५ धावा करून हा अंतिम सामना जिंकला. गोलंदाजीत सय्यद नईम व शेख नादर यांनी प्रत्येकी एक गडी बाद केले. पंच व गुणलेखक म्हणून सय्यद फिरदौस वसीम शेख, शेख जफर, अमान शेख यांनी काम पाहिले. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी शेख अन्सार, शेख अल्ताफ, शेख मुश्ताक, शेख जावेद, शेख मोईन, मोहम्मद फजल, शेख मतीन यांनी परिश्रम घेतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *