
परभणी ः परभणी शहरातील रामराव राठोड विद्या मंदिर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
प्रत्येक व्यक्तीसाठी योगासने ही खूप महत्वाची आहेत. विविध प्रकारच्या योग क्रियांमुळे शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहते व प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी देखील योग साधना महत्वाची आहे. योग दिनाचे औचित्य साधून रामराव राठोड विद्या मंदिर परभणीमध्ये सर्व विद्यार्थ्यांनी खूपच उत्साहाने योगासने पूर्ण केली. यासाठी योग शिक्षक अनिल रावले यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले व योगाचे विविध असणे व प्रात्यक्षिक करून दाखविली.
योग दिनाचे औचित्य साधून शाळेचे सहशिक्षक दिवाणे व गुव्हाडे यांनी विद्यार्थ्यांना योगासनांचे महत्व तसेच विद्यार्थी जीवनात शारीरिक व मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी व एकाग्रता वाढवण्यासाठी योगासने किती लाभदायक आहेत याविषयी माहिती सांगितली तसेच योग दिन का साजरा केला जातो ? व योग दिनाची ऐतिहासिक पार्श्वभूमी व इतर मौलिक अशी माहिती विद्यार्थांना दिली. या प्रसंगी सचिव आशिष अंधारे व मुख्याध्यापक पठाण यांनी विद्यार्थ्यांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व शिक्षकवृंद व विद्यार्थी उपस्थित होते.