
ठाणे ः माथेराम व्हॅली स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
जागतिक योग दिनानिमित्त शाळेत नियोजनबद्ध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्री- प्रायमरी आणि प्रायमरी नेरळ व माथेरान व्हॅली सेकंडरी स्कूल आणि ज्युनिअर कॉलेजचे सर्व विद्यार्थी-विद्यार्धिनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले व योग अभ्यास करून योग आसने करून योगाचे फायदे आणि महत्व समजून घेतले.
शाळेच्या मुख्याध्यापिका मृदुला पटेल यांनी शाळेच्या सर्व शिक्षक वर्ग व कर्मचारी यांच्यासोबत योग आसने करून महत्व सांगितले. शाळेचे प्रशिक्षक स्वप्निल अडूरकर व करण बाबरे यांनी विद्यार्थ्यांकडून योग आसने करून महत्व सांगितले आणि योग प्रात्यक्षिके करून घेतली.योगाचे महत्व समजावे या करिता म्युझिकल योगा प्रात्यक्षिकांचे सादरीकरण केले. इन्चार्ज ऑफ प्री-प्रायमरी आणि प्रायमरी राजश्री चव्हाण सोबत शाळेचे सुपरवायझर मीना अंबोरे व कुंदा पाटील स्कूल व ज्युनियर कॉलेजचे शिक्षक वृंद हजर होते.