वैनतेय इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये योग दिवस उत्साहात संपन्न

  • By admin
  • June 25, 2025
  • 0
  • 14 Views
Spread the love

निफाड ः वैनतैय इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

दरवर्षीप्रमाणे २१ जून हा दिवस जगभरात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा केला जातो. त्याचेच औचित्य साधत वैनतेय इंग्लिश मीडियम स्कूल निफाड येथे योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. क्रीडा शिक्षक विलास गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली ५५० विद्यार्थी आणि शिक्षकांनी आंतरराष्ट्रीय योग दिन एकत्रित योग साधना करुन साजरा केला.

यावेळच्या आंतरराष्ट्रीय योग दिनाची थीम होती स्वतःसाठी आणि समाजासाठी योग. ही संकल्पना फक्त स्वतःच्या आरोग्यापुरती मर्यादित न राहता, संपूर्ण समाजाच्या स्वास्थ्यासाठी योगाचे महत्त्व अधोरेखित करते. योग ही आपल्या देशाची प्राचीन परंपरा असून, ती नव्या पिढीला निरोगी आणि सशक्त ठेवण्यास उपयुक्त ठरणारी आहे. त्यामुळेच संपूर्ण जग या दिवशी योग साधनेसाठी एकत्र येते.

या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष विश्वनाथ व्यवहारे, ॲड लक्ष्मणराव उगावकर, रतन वडघुले, किरण कापसे, राजेंद्र राठी, ॲड दिलीप वाघावकर, राजेश सोनी, प्रभाकर कुयटे, मधुकर राऊत, विश्वासराव कराड, नरेंद्र नांदे, शाळेच्या मुख्याध्यापिका पल्लवी सानप व क्रीडा प्रशिक्षक सुभाष खाटेकर, विलास गायकवाड यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच शाळेतील संपूर्ण शिक्षकवृंद उपस्थित होते व त्यांनी विद्यार्थ्यांसोबत योगाचे महत्त्व अधोरेखित केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *