
बाभुळगाव ः आंतरराष्ट्रीय योग दिन एसएनडी सीबीएसई स्कूल कॅम्पस परिसरात शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरणात साजरा करण्यात आला. शाळेच्या प्राचार्या प्राची पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या उपक्रमात योगाचे शारीरिक, मानसिक व आध्यात्मिक लाभ विद्यार्थ्यांना पटवून देण्यात आले.
कार्यक्रमात अनु शर्मा यांनी विद्यार्थ्यांकडून ताडासन, त्रिकोणासन, वज्रासन, भुजंगासन, प्राणायाम यांसारख्या विविध योगासने अचूक आणि प्रभावीपणे करून घेतली. तसेच योगा विषयी विद्यार्थ्यांनी तन्वी गावित, नयना चौधरी, आरुषी गावित, आदिती गायकवाड, चैतन्य गायकवाड यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षकांनी आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडत उत्कृष्ट समन्वय दाखवला. त्यात पूनम नंदाळे, जयश्री चव्हाण, कादरी, गायत्री भोये, पूजा कोळगे, भारती साप्ते, साक्षी अहिरे, अश्विनी लभडे, अदिती कटाले, पल्लवी काळे, सोनाली संसारे, अश्विनी वर्पे, धनश्री ठाकूर, संदीप दानेकर, करिश्मा पठाण, श्रीकांत सूर्यवंशी, प्रतिभा मस्के, गायत्री भोये, अमोल गायकवाड यांचा समावेश आहे.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन साक्षी अहिरे यांनी केले. शाळेचे वस्तीगृह शिक्षक मच्छिंद्र देवकर व भुसार गोजरा, तसेच कर्मचारी अनंता गर्जे, किरण गोरे, दीपक पगारे आणि भारती यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सहकार्य केले. पालक, शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या एकत्रित सहभागातून कार्यक्रम प्रेरणादायी ठरला.