राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संघ घोषित

  • By admin
  • June 25, 2025
  • 0
  • 60 Views
Spread the love

नवी मुंबई ः २७ वी राष्ट्रीय टेनिस व्हॉलीबॉल स्पर्धा भाटपारा (छत्तीसगड) येथे २६ ते ३० जून या कालावधीत होणार आहे. या स्पर्धेमध्ये सहभागी होणाऱया महाराष्ट्र संघाची घोषणा नवी मुंबई येथे जल्लोषात करण्यात आली.

महाराष्ट्र संघाची निवड चाचणी टेनिस व्हॉलीबॉल महाराष्ट्र असोसिएशनच्या मान्यतेने आणि नवी मुंबई टेनिस व्हॉलीबॉल असोसिएशनच्या विद्यमाने क्राईस्ट अकॅडमी स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, कोपरखैरणे येथे आयोजित करण्यात आली होती. या निवड चाचणी करिता महाराष्ट्रातील नवी मुंबई, ठाणे, मुंबई, परभणी, हिंगोली, मुंबई उपनगर, पुणे, नाशिक, अमरावती अशा विविध जिल्ह्यातही खेळाडूंनी ज्युनिअर आणि सब ज्युनिअर गटात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या निवड चाचणीसाठी टेनिस व्हॉलीबॉल खेळाचे जनक व्यंकटेश वांगवाड यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले आणि क्राईस्ट अकॅडमी स्कूलचे संचालक फादर जेसन यांनी खेळाडूंसोबत संवाद साधला. तसेच महाराष्ट्र टेनिस व्हॉलीबॉलचे राज्य सचिव गणेश माळवे, राज्य उपाध्यक्ष कोरडे, राज्य कोषाध्यक्ष डॉ दिनेश सिंगारम, बालभारती शिक्षक तज्ञ प्रगती भावसार, नवी मुंबई सचिव वैभव शिंदे, नागेश कान्हेकर, अशोक शिंदे,आशिष ओबेरॉय, सचिन भोसले यांची उपस्थिती होती.

महाराष्ट्राचा ज्युनियर संघ

मुले ः कृष्णा अहिरे, विवेक साळुंखे, प्रसाद महाले, मयूर बोरसे, प्रताप पौळ, अनंत धापसे, ईश्वर मोरे, दिव्यांशु चांद ,वेदांत महामाने, गौरव चौधरी, मयूर निकम, वीर पाटील
.
मुली : वेदिका बेंद्रे, मृणाली सरवदे, श्रेया सिंग, सृष्टी शिंदे, मान्यता जैन, अंकिता सरगर.

सब ज्युनिअर मिश्र दुहेरी : राजवीर भोसले सोनाक्षी कदम. ज्युनिअर मिश्र दुहेरी : शिवम कदम, श्रेया धावन. प्रशिक्षक : उज्वला शिंदे, शिवदास खुपसे, गणेश आम्ले,
संघ व्यवस्थापक : निलेश माळवे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *