कोकणस्थ परिवारतर्फे ऑलिम्पिक दिन साजरा

  • By admin
  • June 25, 2025
  • 0
  • 18 Views
Spread the love

पुणे ः कोकणस्थ परिवार पुणे यांच्या वतीने २३ जून रोजी ऑलिंपिक दिन साजरा करण्यात आला.

ऑलिंपिक दिनानिमित्त अंध, अपंग क्रीडापटूंसाठी क्रीडा या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते. ज्येष्ठ क्रीडा संघटक सुनील नेवरेकर, पराग गानू, अंध क्रिकेट मधील वर्ल्ड कप विजेता महाराष्ट्र शासन क्रीडा विभागाचा मुख्य कार्यकारी क्रीडा अधिकारी अमोल करचे यांनी या वेळेला अंध क्रीडापटूंना मार्गदर्शन केले.

पंडित नेहरू स्टेडियम पुणे येथे झालेल्या या चर्चासत्रामध्ये राष्ट्रीय अंध क्रीडापटू संदीप जाधव, दिनेश पाडाळे, आदेश भालेराव, वैभव मांढरे, अक्षय पवळ, संकेत शर्मा, राजू सोळंके आदींनी आपल्या विविध शंका विचारून चर्चासत्रात भाग घेतला. दशरथ पवार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिनकरराव शिंदे हे होते. आनंद पवार यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *