लालबाग येथे जागतिक ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा

  • By admin
  • June 25, 2025
  • 0
  • 13 Views
Spread the love

उमेश मुरकर, विग्नेश मुरकर यांनी केले मार्गदर्शन

मुंबई ः क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व मुंबई विभागीय उपसंचालक कार्यालय मुंबई यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय मुंबई शहर यांच्या सहयोगाने शितो रियु स्पोर्ट्स फराटे अँड किकबॉक्सिंग असोसिएशन व गुरुकुल कृती फाउंडेशन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक ऑलिम्पिक दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

हा कार्यक्रम काळाकिल्ला हनुमान सेवा मंडळ हॉल व महाराष्ट्र सेवा मंडळ, गणेश गल्ली, लालबाग येथे पार पडला. विविध वयोगटातील खेळाडूंनी कराटे व किकबॉक्सिंगसारख्या खेळांमध्ये सहभाग घेत उत्स्फूर्तपणे आपली कला सादर केली.

कार्यक्रमास गुरुकुल कृती फाउंडेशन ट्रस्टचे विश्वस्त उमेश मुरकर व विघ्नेश मुरकर यांनी उपस्थित राहून कराटे व किकबॉक्सिंग या खेळांचे शारीरिक व मानसिक स्वास्थ्यासाठी महत्त्व, तसेच खेळांमधील करिअरच्या संधी यावर मोलाचे मार्गदर्शन केले. त्यांनी तरुण पिढीला शारीरिक तंदुरुस्ती आणि आत्मसंरक्षणाच्या दृष्टीने अशा प्रकारच्या खेळांमध्ये सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन केले.

कार्यक्रमात उपस्थित प्रशिक्षक व पदाधिकाऱ्यांनी देखील खेळाडूंना प्रोत्साहित करत त्यांच्या प्रयत्नांची प्रशंसा केली. कार्यक्रमाची सांगता पारितोषिक वितरण व सामूहिक छायाचित्र सत्राने करण्यात आली.

गुरुकुल कृती फाउंडेशन ट्रस्ट व शितो रियु असोसिएशन यांनी घेतलेला पुढाकार आणि जिल्हा क्रीडा कार्यालयाचे सहकार्य यामुळे हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला. अशा कार्यक्रमांद्वारे खेळाडूंमध्ये ऑलिंपिक मूल्यांचा प्रचार व प्रसार होत असून, त्यांचे सर्वांगीण विकास साधणे शक्य होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *