
लातूर ः महाराष्ट्र ॲथलेटिक्स असोसिएशन व पुणे जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय खुला गट (पुरुष -महिला) मैदानी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत रसिका महाविद्यालयाची विद्यार्थिनी आरती टिंगरेने (बांबू उडी) पोल क्रीडा प्रकारात राज्यातून द्वितीय क्रमांक पटकावलेला आहे.
आरतीला डॉ सचिन चामले यांचे मार्गदर्शन लाभले आहे. आरती टिंगरे हिने मिळवलेल्या घवघवीत यशाबद्दल संस्था अध्यक्ष गोविंदराव भोपणीकर, सचिव गजानन भोपणीकर व सर्व संस्था पदाधिकाऱ्यांतर्फे तसेच प्राचार्य डॉ चंद्रकांत जावळे व महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी आरतीचे अभिनंदन केले आहे व पुढील स्पर्धेसाठी खेळाडूंना शुभेच्छा दिल्या आहेत.