
छत्रपती संभाजीनगर ः महिला मंडळ औरंगाबाद संचलित शिशुविकास मंदिर माध्यमिक शाळेत आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न झाला.
२१ जून आंतरराष्ट्रीय योग दिन सर्वदूर मोठ्या उत्साहात संपन्न झाला. त्याप्रमाणे अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, रोटरी क्लब ऑफ औरंगाबाद मेट्रो अँड कॅन्टोन्मेंट, इन्स्टिट्यूशन ऑफ व्हेल्युअर्स, असोसिएशन ऑफ सिव्हिल इंजिनिअर प्रॅक्टिसिंग आणि शिशुविकास मंदिर माध्यमिक शाळा श्रेयनगर, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने शिशुविकास मंदिर माध्यमिक शाळा श्रेयनगर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात व आनंदात संपन्न झाला.
यावेळी शालेय परिपाठ झाल्यानंतर सरस्वती देवीच्या पूजनाने सुरुवात झालेल्या कार्यक्रमात महिला मंडळ औरंगाबाद संस्थेची थोडक्यात माहिती देण्यात आली. त्यानंतर योग शिक्षक पंडित वाहतुळे, राज वकील व मिलिंद देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांकडून योगसाधना करून घेण्यात आली. यामध्ये प्राणायाम, विविध आसने विद्यार्थ्यांकडून करून घेण्यात आली आणि शांतीपाठाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
अल्ट्राटेक सिमेंट व रोटरी क्लब औरंगाबाद यांच्यातर्फे घेण्यात आलेल्या चित्रकला व निबंध स्पर्धेत क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे प्रदान करण्यात आली. यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका अनिता कुलकर्णी तसेच विजय संकलेचा, रिजनल हेड मार्केटिंग अल्ट्राटेक तसेच हरीश देशपांडे, टेरिटरी सेल्स हेड अल्ट्राटेक, विजय चव्हाण, राजन डागा, एइसीपी सेक्रेटरी, प्रमोद सावंत, चेअरमन इन्स्टिट्यूशन ऑफ व्हेल्युअर्स आणि चंद्रकांत चौधरी, रोटरी क्लब ऑफ मेट्रो पास्ट प्रेसिडेंट व इतर मान्यवर, शाळेतील शिक्षक व शिक्षकेतर सहकारी आणि विद्यार्थी तसेच पालकांनी उस्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हर्षदा डोरले तसेच आभार प्रदर्शन डी आर खैरनार यांनी केले.