बुद्धिबळ स्पर्धेत मानांकित खेळाडूंची आगेकूच 

  • By admin
  • June 26, 2025
  • 0
  • 22 Views
Spread the love

सोलापूर ः डॉ व्ही एम मेडिकल कॉलेज कर्मचारी सहकारी पतसंस्थेच्या वतीने प्रायोजित करण्यात आलेल्या जिल्हा बुद्धिबळ स्पर्धेत चौथ्या फेरीअखेर मानांकित खेळाडूंचे विजय मिळविले.

श्री रमा जगदीश बहुउद्देशीय महिला उत्कर्ष संस्थेच्या वतीने व सोलापूर डिस्ट्रिक्ट चेस असोसिएशनच्या सहकार्याने ही स्पर्धा आयोजित केली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे सचिव रमाकांत फुटाणे यांचे हस्ते झाले. याप्रसंगी संस्थापक अध्यक्ष डी टी जोशी, उपाध्यक्ष डी जे बंडगर, सी एस माशाळ, आर एस जाधव, शैलजा नाकामुटे, वाय आर पांढरे, संजय गायकवाड, मधुकर बोलाबत्तीन हे उपस्थित होते.  

ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी स्पर्धेचे प्रमुख पंच म्हणून प्रशांत पिसे, इरान्ना जमादार, सचिन चव्हाण, सम्मेद हुल्ले, रोहित केशपाग, हरीओम नाईक, मंगला हुल्ले, संस्कार भस्मे,  अनिरुद्ध कुलकर्णी हे काम पाहत आहेत. या स्पर्धेत २१३ खेळाडूंचा प्रतिसाद लाभला आहे. चौथ्या फेरीअखेर चौदा वर्षांखालील गटात हर्ष हलमल्ली, सार्थक उंबरे, साईराज घोडके, अंश राठोड, वेदांत मुसळे, अमेय शिवपूजे, समरजीत देशमुख, झांजणे प्रतीक हे खेळाडू आघाडीवर आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *