परभणी तलवारबाजी संघात सेलूच्या सात खेळाडूंचा समावेश 

  • By admin
  • June 26, 2025
  • 0
  • 75 Views
Spread the love

सेलू ः सेलू येथील नूतन विद्यालय शिक्षण संस्था सेलू प्रशिक्षण केंद्रातील सात खेळाडू छत्रपती संभाजीनगर येथील राज्य चाईल्ड व मिनी तलवारबाजी क्रीडा स्पर्धेसाठी रवाना झाले आहेत. 

महाराष्ट्र तलवारबाजी संघटना व छत्रपती संभाजीनगर जिल्हा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दहा वर्षांखालील व बारा वर्षांखालील गट या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये परभणी जिल्हा तलवारबाजी असोसिएशन वतीने सहभागी होणार आहे. या संघात शरद भूमकर, ईश्वरी डोंबे, ईश्वरी गोरे, अर्णव डख, अभिनव काष्टे, तेज चव्हाण, स्वयम लव्हाळे आदींचा समावेश आहे.
या संघाला संजय भूमकर व जिजाभाऊ डख मार्गदर्शन करणार आहेत. या संघाला संघटनेचे अध्यक्ष ॲड दीपकराव देशमुख, जिल्हा संघटनेचे सचिव डॉ पांडुरंग रनमाळ, मुख्याध्यापक संतोष पाटील, उपमुख्याध्यापक के के देशपांडे, पर्यवेक्षक रोहिदास मोगल, शंकर बोधनापोड, गणेश माळवे, प्रशांत नाईक यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *